शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:07 IST

1 / 8
ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिला जाणारा एक सन्मान आणि कृतज्ञतेचा आर्थिक लाभ आहे.  कर्मचाऱ्याने कंपनीसाठी सलग सेवा दिली म्हणून कंपनी त्याचे आभार मानत ही रक्कम देते. प्रायव्हेट जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ग्रॅच्युइटी विषयावर कायम चर्चा असते.
2 / 8
नवीन नियम काय? - पूर्वी ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान ५ वर्षे सलग नोकरी करणे बंधनकारक होते. पण आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी असलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त १ वर्ष सेवा केली तरीही ग्रॅच्युइटी मिळेल. 
3 / 8
ग्रॅच्युइटी का महत्त्वाची? - ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचारी कंपनी सोडताना किंवा निवृत्त होताना मिळणारी एक एकरकमी रक्कम. ही रक्कम भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार देते.
4 / 8
ग्रॅच्युइटी कशी कॅल्क्युलेट करतात? - ग्रॅच्युइटी काढण्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे,  फॉर्म्युला - ग्रॅच्युइटी = (अंतिम पगार) × (१५/२६) × (काम केलेली वर्षे) अंतिम पगार = बेसिक + डीए
5 / 8
उदाहरण - समजा, तुम्ही कंपनीत ५ वर्षे काम केले, तुमचा लास्ट बेसिक + डीए = ५०,०००, कॅल्क्युलेशन : ५०,००० × (१५/२६) × ५ = १,४४,२३० म्हणजे ५ वर्षांच्या नोकरीनंतर तुम्हाला १,४४,२३० ग्रॅच्युइटी मिळेल.
6 / 8
कोठे लागू आहे हा नियम? - कारखाने, खाणी, ऑइल फील्ड, बंदरे, रेल्वे...नवीन कायद्यानुसार फक्त १ वर्ष सेवा केली तरी तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळू शकते. त्याचा लाखोंना फायदा होईल. ग्रॅच्युइटीची गणना बेसिक डीए वर होते. नवीन नियमानुसार बेसिक पे एकूण पगाराच्या किमान असायला हवा.
7 / 8
समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया - एकूण वेतन : ५०,००० रुपये, यातले बेसिक + डीए : २५,००० (उदाहरणासाठी) शेवटच्या महिन्याचा पगार गणनेत घेतला जातो. ग्रॅच्युइटी काढण्याचा फॉर्म्युला : ग्रॅच्युइटी = (बेसिक + डीए) × १५ × नोकरीची वर्षे ÷ २६....१ वर्ष नोकरी : (२५,००० × १५ × १) ÷ २६ = १४,४२३, २ वर्ष नोकरी : (२५,००० × १५ × २) ÷ २६ = २८,८४६, ३ वर्ष नोकरी : (२५,००० × १५ × ३) ÷ २६ = ४३,२६९, ४ वर्ष नोकरी : (२५,००० × १५ × ४) ÷ २६ = ५७,६९२
8 / 8
प्रश्न : नवीन ग्रॅच्युइटीचा नियम कधी लागू होईल? उत्तर : कंपन्यांना साधारण ४५ दिवसांचा वेळ दिला जातो, जेणेकरून ते त्यांच्या सिस्टीम, नियम आणि कागदपत्रांमध्ये बदल करू शकतील. यामुळे अंदाज आहे की ग्रॅच्युइटीचा नवा नियम नवीन वर्षापासून लागू होऊ शकतो.
टॅग्स :jobनोकरी