1 / 9Rules Change From 1st July: १ जुलैपासून पॅन, आयटीआर, रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नवे नियम लागू होत आहेत. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल. सुरक्षा वाढवणं, डिजिटल व्यवहार सुलभ करणं आणि कायदेशीर अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी हे नियम असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. परंतु सामान्य लोकांसाठी ते काही ठिकाणी त्रास आणि अतिरिक्त खर्च देखील होऊ शकतो. त्यामुळे या बदलांपूर्वी तुम्ही तुमची कामं पार पाडणं किंवा नव्या शुल्कांची माहिती असणं गरजेचं आहे.2 / 9१ जुलैपासून नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जन्म प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रं देखील पॅन बनवण्यासाठी वापरली जाऊ शकत होती, परंतु आता फक्त आधारच स्वीकारलं जाईल. ज्यांच्याकडे आधीच पॅन आहे पण ते आधारशी लिंक केलेलं नाही त्यांच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंतची वेळ आहे. जर हे केलं नाही तर पॅन निष्क्रिय होईल, ज्यामुळे कर भरण्यापासून ते बँकिंगपर्यंतच्या प्रत्येक कामावर परिणाम होईल.3 / 9आता रेल्वेच्या तात्काळ कोचमध्येही आधारशिवाय तिकीट बुकिंग करता येणार नाही. तात्काळ तिकिटं बुक करण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, १५ जुलैपासून ऑनलाइन आणि काउंटरवर तिकीट बुकिंग करताना टू-फॅक्टर ओटीपी पडताळणी लागू होईल. म्हणजेच, नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा लागेल. आणखी एक मोठी बातमी म्हणजे रेल्वे भाडं वाढवण्याचा विचार करत आहे. नॉन-एसी कोचसाठी प्रति किमी १ पैसे आणि एसी कोचसाठी प्रति किमी २ पैसे वाढ होऊ शकते.4 / 9करदात्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आयकर विभागानं आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच पगारदारांना आता रिटर्न भरण्यासाठी ४६ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळालाय. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी कर तज्ज्ञ आपला आयटीआर लवकर भरण्याचा सल्ला देतात.5 / 9 एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय सारख्या मोठ्या बँका आता तुमच्या क्रेडिट कार्डवर नवीन नियम लादत आहेत.6 / 9एसबीआय एलिट आणि माइल्स सारख्या प्रीमियम कार्डवर उपलब्ध असलेली हवाई अपघात विमा सुविधा आता बंद केली जाणार आहे. तसंच, किमान मासिक थकबाकी रक्कम (MAD) मोजण्याची पद्धत देखील बदलेल.7 / 9आता, भाडं भरणं, ऑनलाइन गेमिंगवर १०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च करणं, विमा वगळता ५०,००० रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल भरणं आणि डिजिटल वॉलेटमध्ये एकाच वेळी १०,०००+ रुपये जोडणं यासाठी १% शुल्क (जास्तीत जास्त ४,९९९ रुपयांपर्यंत) आकारलं जाईल.8 / 9आयसीआयसीआय बँकेच्या स्वतःच्या एटीएममधून पहिल्यांदा ५ वेळा पैसे काढणं मोफत आहे, त्यानंतर २३ रुपये शुल्क आकारलं जाईल. महानगरांमध्ये ३ मोफत व्यवहार आणि नॉन-मेट्रोमध्ये ५ मोफत व्यवहारांनंतर, रोख पैसे काढण्यासाठी २३ रुपये आणि इतर बँकेच्या एटीएममधून शिल्लक तपासणीसाठी ८.५० रुपये शुल्क आकारलं जाईल.9 / 9कॅश रिसायकलर मशीनमध्ये पहिल्या ३ ठेवी मोफत आहेत, त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी १५० रुपये आकारले जातील. एका महिन्यात १ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींसाठी १५० रुपये किंवा प्रति १००० रुपयांसाठी ३.५ रुपये (जे जास्त असेल ते) आकारलं जाईल.