Salary Saving Formula: पगार येताच ५०, ३०, २० फॉर्म्युला लक्षात ठेवा; कारची हौस, घराचे स्वप्न आणि मौजमजा, सेव्हिंग सर्व पूर्ण होईल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:20 IST
1 / 8नोकरदार वर्गाचे महिन्याच्या अखेरीस जरा कठीणच असते. याच्या त्याच्याकडे पैसे मागण्याची वेळ येते. पगार झाला झाला की पहिल्याच आठवड्यात घर, गाडी, मोबाईल आदींचे हप्ते कापून घेतले जातात. मग सुरु होतो तो दोरीवरचा काटकसरीचा प्रवास... तुम्हाला आम्ही एक फॉ़र्म्युला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कारची हौस, घराचे स्वप्न आणि मौजमजा, सेव्हिंग सर्व काही करता येणार आहे. 2 / 8पगार आला की त्याचे पैसे तुम्ही ५०, ३०, २० फॉर्म्युलाने नियंत्रित करू शकता व घराचे बजेट बनवू शकता. सॅलरीड क्लास लोकांचा पगार महिन्याच्या २५ तारखेपासून दुसऱ्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होतो. यामुळे हे लोक महिन्याच्या १ ते १० तारखेला हप्ते निवडतात. ते त्या तारखेला आपोआप क्रेडिट होतात. यामुळे सॅलरी आल्यानंतर तुमचा आधी ५० टक्के हा हप्त्यांचा खर्च बाजुला ठेवा. 3 / 8हा तुमचा बेसिक खर्च आहे, ज्यात तुम्ही काहीही केले तरी बदल करू शकत नाही. यामध्ये घराचे भाडे, घराचा ईएमआय, कारचा ईएमआय, पेट्रोल, किराणा आदींचा खर्च येतो. यात इंटरनेट, मोबाईल रिचार्जदेखील आले. हा असा खर्च असतो ज्यात कपात करता येत नाही. यामुळे पगार येताच याचे पैसे बाजुला करा. 4 / 8यानंतर तुमच्या हातात ५० टक्के पगार उरतो. हप्ते किती असावेत याचे काही गणित आहे. त्याच्यावर हप्ते गेल्यास महिन्याचे बजेट कोलमडते. यामुळे पगाराच्या काही भागच हप्ते ठेवा. 5 / 8पगाराचा ३० टक्के भाग तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करू शकता. यामध्ये मुव्ही पाहणे, रेस्टॉरंटमध्ये जाणे, खेळ, फिरायला जाणे आदी करू शकता. हा ३० टक्क्यांचा वाटा खर्च करणे खूप आव्हानात्मक आहे. नवीन फोन घेणे, सुट्टीत बाहेर जाणे आदी गोष्टींसाठी तुम्हाला पैसे मॅनेज करावे लागतील. यातील सर्वात गरजेचे काम आधी पूर्ण करा. 6 / 8५० टक्के आणि ३० टक्के पगार खर्च केला की तुमच्या हातात उरतो तो २० टक्के हिस्सा. हा हिस्सा खूप महत्वाचा आहे. ज्याकडे लोक नेहमीच दुर्लक्ष करतात आणि तो देखील खर्च करून टाकतात. हा हिस्सा तुमचे भविष्य, मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. मुव्ही पाहण्यासाठी एकवेळ पैसा खर्च करू नका परंतू तुम्ही सेव्हिंगमध्ये पैसे गुंतवा. 7 / 8म्यूचुअल फंड (Mutual Fund) मध्ये तुम्ही एसआयपी करू शकता. हेल्थ इंशुरन्स, टर्म इन्शुरन्स, एफडी, पोस्टाच्या योजनाच पेन्शन योजना आदींमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामुळे जेव्हा पगार येईल तेव्हा तेव्हा ५०, ३०, २० फॉर्म्युला विसरू नका.8 / 8जे लोक श्रीमंत असतात, त्यांच्याकडे पैशाकडे पैसा खेचला जातो असे म्हणतात... पण तसे नाही. ते पैसे आले की त्यातून आधी गुंतवणुकीचे पाहतात. मग उरलेला पैसे खर्च करतात. आपल्यासाऱख्या सामान्यांचे त्याच्या उलटे असते.