1 / 6रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) केवायसी नियम आणखी शिथिल करण्यासाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. जेणेकरून बँक खातेधारकांना त्यांची दीर्घकाळ बंद असलेली खाती आणि दावा न केलेल्या ठेवी पुन्हा सुरू करता येतील. 2 / 6या नव्या नियमांनुसार आता ग्राहकाला बंद खातं सुरू करण्यासाठी, त्यांनी ज्या शाखेत खातं उघडलं आहे, त्याच शाखेत जाण्याची गरज नाही. केवायसी अपडेट आता कोणत्याही बँकेच्या शाखेतून करता येईल, मग ती होम ब्रँच असो वा नसो.3 / 6यामुळे ग्राहकांना आता व्हिडिओ कॉलद्वारे केवायसी करता येणार आहे. याला व्हिडिओ-कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस म्हणतात. विशेषत: वृद्ध, अनिवासी भारतीय आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सुविधा फायदेशीर आहे.4 / 6आता बँकिंग प्रतिनिधींना केवायसी अपडेट करण्याची किंवा पीरिऑडिक अपडेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं आरबीआयनं म्हटलं. याशिवाय केवायसी अद्ययावत प्रक्रियेचं पालन करण्यासाठी बँकांना ग्राहकांना पत्राद्वारे किमान एक नोटीस आणि कमीतकमी तीन आगाऊ सूचना द्याव्यात, असंही त्यांनी नमूद केलंय.5 / 6रिझर्व्ह बँकेनं बँका आणि एनबीएफसींना निर्देश दिलेत की त्यांनी तथाकथित कमी जोखीम असलेल्या ग्राहकांकडून सर्व व्यवहारांना परवानगी द्यावी. केवायसी प्रलंबित असलं तरीही त्यांना परवानगी देण्याचे निर्देश आरबीआयनं दिलेत. या ग्राहकांना त्यांचे केवायसी अपडेट करण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत वेळ आहे.6 / 6रिझर्व्ह बँकेनं बँकिंग प्रतिनिधींना केवायसी अपडेट करण्याचा अधिकार दिलाय. बँकिंग प्रतिनिधी म्हणजे एनजीओ, स्वयंसेवा गट (एसएचजी), मायक्रो फायनान्स संस्था (एमएफआय) सारख्या संस्था ज्या बँक त्यांचे एजंट म्हणून काम करण्यासाठी करार करते. तुमच्या स्थानिक किराणा दुकानाच्या मालकाला बँकेकडून परवानगी मिळाल्यास तो देखील बँकिंग प्रतिनिधी म्हणून पॅनलवर येऊ शकतो.