शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ रुपयांच्या लेमन गोळीने घातला धुमाकूळ; एका वर्षात केली ७५० कोटींची कमाई, मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:57 IST

1 / 7
Pulse Candy Owner: तुम्हाला लेमन गोळी माहिती असेलच. या गोळीची चव तुम्हाला फ्रेश आणि मन तासन्तास ताजेतवाने ठेवते. अनेक वर्षांपासून लेमन गोळी बाजारात उपलब्ध आहे. पण, २०१५ मध्ये एक अशी लेमन गोळी बाजारात आली, ज्याने धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे, कंपनीने या गोळीची जाहिरीत केली नाही, तरीदेखील ग्राहकांच्या मनावर राज्य केले.
2 / 7
जिथे सामान्यतः चॉकलेट, कँडी, टॉफी गोड असते, तिथे या खारट गोळीने लोकांना वेड लावले. ज्या काळात परदेशी डार्क चॉकलेट आणि कॉफी फ्लेवर्ड महागड्या चॉकलेटचे वर्चस्व होते, तिथे अवघ्या १ रुपयांच्या या कँडीने तब्बल ७५० कोटींची कमाई केली. या कच्च्या आंब्याच्या फ्लेवर्ड प्लस कँडीने लोकांना त्याच्या चवीच्या मोहित केले. चव अशी की, एक-दोन कँडी खरेदी करण्याऐवजी लोक त्याचे बॉक्स खरेदी करू लागले.
3 / 7
पल्स कँडी कोणी बनवली? डीएस ग्रुपने ही पल्स कँडी बनवली. पल्स कँडीने लॉन्च झाल्यानंतर फक्त ८ महिन्यांत १०० कोटींचा व्यवसाय केला. कोणत्याही जाहिरातीशिवाय या कँडीने चॉकलेट मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, १ रुपयांच्या या पल्स कँडीने कोका कोलाच्या कोक झिरो ड्रिंक ड्रिंकच्या विक्रमाची बरोबरी केली.
4 / 7
पल्स कँडी इतका मोठा ब्रँड कसा बनला? कमी किंमत, चांगले रिटेल मार्जिन आणि वितरणामुळे पल्सला यश मिळाले. एका वर्षाच्या आत, पल्सने ८.५ लाख रिटेल आउटलेटवर विक्री सुरू केली. त्यांच्याकडे २५५ वितरकांचे मोठे नेटवर्क आहे. स्थानिक पानवाल्यांपासून ते मेगा रिटेल दुकाने आणि मॉलमध्ये पल्स कँडी विकण्यास सुरुवात झाली. एका वर्षाच्या आत, कंपनीने मोठे यश मिळवले.
5 / 7
पल्स कँडीने कंपनीला मालामाल केले- नोएडा येथील या कंपनीने फक्त १ रुपयांत पल्स कँडी लॉन्च केली. माउथ पब्लिसिटी आणि चवीमुळे नऊ वर्षांत एक मोठा ब्रँड बनली. धरमपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) चे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या मते, पल्स कँडी ब्रँड दोन वर्षांत १००० कोटी रुपयांचा विक्रीचा टप्पा ओलांडेल. २०२५ च्या आर्थिक वर्षात या कँडीने ७५० कोटी रुपये कमावले आहेत.
6 / 7
सर्वाधिक विकली जाणारी कँडी कोणती? २०१५ मध्ये आलेल्या पल्स कँडीने पार्लेच्या मँगो बाईट या अल्पेनलीबेला जोरदार टक्कर दिली. गेल्या १० वर्षांपासून कँडी मार्केटवर राज्य करणाऱ्या अल्पेनलीबेला पल्सकडून कठीण आव्हाने मिळू लागले.
7 / 7
भारतातील ६६०० कोटी रुपयांच्या या टॉफी मार्केटमध्ये पल्सच्या प्रवेशाने खळबळ उडाली. पण, सध्या या मार्केटवर इटलीच्या परफेट्टी कंपनीचे वर्चस्व आहे. ही कंपनी अल्पेनलीबे, क्लोर-मिंट, मेंटोस कँडी आणि हॅप्टुडेंड च्युइंग गम बनवते. २००० कोटी रुपयांच्या वार्षिक विक्रीसह, ही कॅन्डी विकणारी नंबर १ आहे.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूक