शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक

By जयदीप दाभोळकर | Updated: August 5, 2025 08:58 IST

1 / 8
PPF Investment Money: आजकाल प्रत्येकजण आपले पैसे सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवू इच्छितो. म्हणून जर तुम्हालाही तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित हवे असतील आणि त्यावर तुम्हाला चांगलं व्याजही मिळू शकेल असं वाटत असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा यासाठी एक उत्तम पर्याय आहे. PPF ही एक सरकारी हमी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि दरवर्षी जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता.
2 / 8
सर्वात खास आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पीपीएफमध्ये अशी एक पद्धत आहे ज्याद्वारे तुम्ही एकही पैसा न गुंतवता ₹२.८८ लाखांपर्यंत व्याज मिळवू शकता. परंतु एकमेव अट अशी आहे की तुम्ही १५ वर्षे नियमितपणे गुंतवणूक केलेली हवी.
3 / 8
जर तुम्ही पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवले तर एकूण २२.५ लाख रुपये जमा होतील. यावर तुम्हाला सुमारे ७.१% दराने सुमारे १८.१८ लाख रुपये व्याज मिळू शकते, त्यानुसार तुमचा निधी मॅच्युरिटीवर ४०.६८ लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो.
4 / 8
पण आता विशेष म्हणजे हा निधी नवीन रक्कम न जोडता पीपीएफमध्ये आणखी ठेवता येतो, ज्यामुळे दरवर्षी २.८८ लाख रुपयांपर्यंत व्याज मिळत राहील. म्हणजेच एकदा गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात दरवर्षी मोफत उत्पन्न मिळवू शकता आणि तेही पूर्णपणे करमुक्त.
5 / 8
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफमध्ये १५ वर्षे न थांबता गुंतवणूक केली असेल आणि योजना मॅच्युअर झाली असेल, तर तुम्ही ताबडतोब पैसे काढणं आवश्यक नाही. खरं तर, तुम्ही नवीन पैसे न जोडता हे खाते आणखी वाढवू शकता, ज्याला 'PPF Extension Without Contribution' म्हणतात. पीपीएफच्या या विस्तारासाठी कोणत्याही अर्जाची आवश्यकता नाही, जर तुम्ही पैसे काढले नाहीत तर ही सुविधा आपोआप सुरू होते. चांगली गोष्ट म्हणजे या वाढीव कालावधीत, जमा केलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज जोडलं जात राहतं आणि तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा संपूर्ण रक्कम काढू शकता.
6 / 8
जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरवर्षी १५ वर्षांसाठी पीपीएफमध्ये १.५ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर सुमारे ४०.६८ लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. तर आता जर तुम्ही हा निधी पीपीएफ खात्यातच राहू दिला आणि कोणतीही नवीन रक्कम जोडली नाही, तर या रकमेवर दरवर्षी ७.१% व्याजदरानं सुमारे २.८८ लाख रुपये व्याज मिळू शकते. हो, हे कोणत्याही कठोर परिश्रमाशिवाय कमाईचा एक मार्ग मानला जाऊ शकतो. जोपर्यंत पैसे पीपीएफ खात्यात राहतात तोपर्यंत त्यावर व्याज मिळू शकतं. हेच कारण आहे की ही योजना गुंतवणूक न करताही दीर्घकाळात उत्तम परतावा मिळविण्याची संधी देते.
7 / 8
हो, पीपीएफ खातं केवळ गुंतवणुकीशिवायच नव्हे तर गुंतवणुकीसह देखील मुदतपूर्तीनंतर वाढवता येतं. यासाठी गुंतवणूकदारानं खात्याच्या मुदतपूर्तीच्या एका वर्षाच्या आत फॉर्मद्वारे मुदतवाढीची विनंती करणं आवश्यक आहे. जेव्हा योगदानासह मुदतवाढ निवडली जाते, तेव्हा पीपीएफ खातं थेट ५ वर्षांसाठी वाढवलं जातं. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही ही सुविधा तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा - प्रत्येक वेळी ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये घेऊ शकता. दीर्घकालीन करमुक्त बचतीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
8 / 8
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :PPFपीपीएफInvestmentगुंतवणूकMONEYपैसा