७.५ टक्के व्याज देणारी FD देते ७.७% व्याज देणाऱ्या NSC पेक्षा अधिक नफा, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 10:41 IST
1 / 10NSC Vs FD Investment : हल्ली अनेक जण भविष्यातील गरजांच्या दृष्टीनं गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. शेअर बाजारातील गुंतवणूकीत जोखीम अधिक असल्यानं बरेच लोक आजही एफडी किंवा एनएसईसारख्या पर्ययांमध्ये आपले पैसे गुंतवतात. पाहूया एफडी आणि एनएससी पैकी कोणती स्कीम तुम्हाला जास्त फायदा मिळवून देऊ शकते.2 / 10पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या मुदतीच्या दोन योजना ऑफर करते, पोस्ट ऑफिस एफडी ज्यावर ७.५% व्याज मिळतं आणि एनएससी ज्यावर ७.७% व्याज मिळतं. तुम्ही कशात गुंतवणूक करणार आहात असं विचारलं तर साहजिकच तुम्ही जास्त व्याज पाहून ७.७ टक्के परतावा देणारी स्कीम निवडाल. कारण व्याजदर जास्त असेल तर फायदा जास्त होईल असे तुम्हाला वाटत असेल. पण तसं होत नाही. 3 / 10आपल्या गुंतवणुकीवरील व्याज तिमाही किंवा वार्षिक आधारावर मोजलं जात आहे की नाही यावर आपला परतावा बरेचदा अवलंबून असतो. पोस्ट ऑफिस एफडी आणि एनएससीमध्ये हा फरक आहे. कसं ते समजून घ्या.4 / 10पोस्ट ऑफिस टीडी म्हणजेच पोस्ट ऑफिस एफडी स्कीम ५ वर्षांची आहे. ७.५ टक्के दरानं यात व्याज दिलं जातं. या योजनेतील व्याज दरवर्षी दिलं जातं, परंतु त्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. म्हणजे ७.५% व्याज असेल तर ते तिमाही आधारावर ४ भागांमध्ये विभागलं जाते. ७.५/४= १.८७५% दर तीन महिन्यांनी दिलं जातं.5 / 10अशा परिस्थितीत मोजणीची पद्धत अशी असेल - जर तुम्ही योजनेत १,००,००० रुपये गुंतवले तर पहिल्या तीन महिन्यांत १.८७५% दरानं १,८७५ रुपये व्याज होईल. अशा प्रकारे ही रक्कम १,०१,८७५ रुपये होईल. पुढील तीन महिन्यांनंतर संपूर्ण रकमेवर म्हजेच १,०१,८७५ रुपयांवर १.८७५% व्याज दिलं जाईल. 6 / 10अशा प्रकारे दर तीन महिन्यांनी व्याजासह संपूर्ण रकमेवर १.८७५% दरानं व्याज दिलं जाईल. अशा प्रकारे १.८७५% दरानं वर्षातून ४ वेळा आणि ५ वर्षात २० वेळा व्याज दिलं जाईल. अशा प्रकारे ५ वर्षांसाठी हिशोब केला तर मॅच्युरिटीची रक्कम १,४४,९९५ रुपये होईल.7 / 10एनएससीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.७ टक्के दरानं व्याज मिळेल. ही योजना देखील ५ वर्षांची आहे. हा व्याजदर पोस्ट ऑफिसटीडीपेक्षा जास्त आहे. परंतु व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही एनएससीमध्ये १,००,००० रुपये गुंतवले तर ते वर्षाला १,००,००० वर ७.७% दरानं व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला वर्षभरात ७,७०० रुपयांचं व्याज मिळेल. 8 / 10दुसऱ्या वर्षी १,०७,७०० रुपयांवर ७.७% दरानं व्याज दिलं जाईल. अशा प्रकारे मुद्दल आणि व्याजासह संपूर्ण रकमेवर ५ वर्षांत ५ वेळा व्याज दिलं जाईल आणि मॅच्युरिटीची रक्कम १,४४,९०३ रुपये होईल.9 / 10हिशोबानुसार तुम्ही पाहिलं की पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये मिळणारी रक्कम एनएससीपेक्षा ९२ रुपये जास्त असेल. हा फरक खूप कमी आहे, परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की कमी व्याज दर असूनही पोस्ट ऑफिस टीडीचा नफा एनएससीपेक्षा जास्त आहे. 10 / 10जर ५ वर्षांच्या टीडीमध्ये ७.७% दरानं व्याज मिळालं असते तर मॅच्युरिटीची रक्कम १,४६,४२५ रुपये झाली असती. अशा परिस्थितीत समान कार्यकाळ आणि समान व्याजदर असूनही पोस्ट ऑफिस एफडीचा नफा एनएससीच्या नफ्यापेक्षा १,५२२ रुपये जास्त झाला असता.