शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol Diesel: देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; भारतानं रशियासमोर ठेवली एक मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 3:09 PM

1 / 7
देशात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. रशिया-यूक्रेन युद्धामुळे जगभरातील इंधनावर परिणाम झाल्याचं सांगण्यात येते. मुंबईत पेट्रोलचे दर १२० रुपयांहून अधिक प्रति लीटर झाले आहेत. डिझेलचे दरही गगनाला भिडलेत.
2 / 7
आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, भारताकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी रशियाला तयार केले जात आहे. ब्लूमबर्गनुसार, रशियाने भारताला ७० डॉलर प्रति बॅरलहून कमी दरात कच्चे तेल विकावं यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
3 / 7
तज्ज्ञांच्या मते, जर ७० डॉलर प्रति बॅरल हिशोबाने भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली तर देशात वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून भारतीयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या रशिया-यूक्रेन युद्धामुळे इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.
4 / 7
कच्च्या तेलाची सध्या किंमत १०५ डॉलर प्रति बॅरेल इतकी आहे. रशिया-यूक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळात १३० डॉलर प्रति बॅरलपर्यंत इंधनाचे भाव पोहचले होते. यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत.
5 / 7
त्यामुळे भारताने तेल उत्पादक रशियासोबत डील करण्यासाठी जोखीम भरपाई करण्यासाठी तेल खरेदीवर सूट घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण रशियाकडून तेल खरेदी केल्यानं इतर तेल उत्पादक देश भारतावर नाराज होण्याची शक्यता आहे.
6 / 7
सूत्रांच्या माहितीनुसार, ब्लूमबर्गनं सांगितलं की, खरेदीसाठी फंडिंग मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता सूट मागण्याची तयारी भारताने केली आहे. परंतु अधिकृतपणे भारत सरकारने यावर कुठलीही भूमिका जाहीर केली नाही.
7 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, जगातील तिसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार असलेल्या भारताने यूक्रेन हल्ल्यानंतर रशियाकडून आतापर्यंत ४० मिलियन बॅरल तेल खरेदी केले आहे. मंत्रालयाच्या आकड्यानुसार, ब्लूमबर्गच्या गणनेनुसार, २०२१ च्या तुलनेत रशियाकडून भारताने यंदा २० टक्के जास्त तेल खरेदी केली आहे.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल