शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त पैसे काढणे नाही, तर 'ही' ८ कामे सुद्धा ATM मध्ये करता येतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 9:23 AM

1 / 9
एटीएम म्हणजेच ऑटोमेटेड टेलर मशिन, एकेकाळी हे मशिन सुट्टे पैसे देण्यासाठी तयार करण्यात आले होते. पुढे ते लोकांसाठी रोख रक्कम काढण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे. दरम्यान, एटीएम मशीन ग्राहकांना आपल्या अकाउंटमधून पैसे काढण्याची सुविधा देते. याशिवाय, हे ८ वित्तीय सेवा पूर्ण करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
2 / 9
तुम्हाला बहुतांश बँकांच्या एटीएम मशीनवर एका डेबिट कार्डवरून दुसऱ्या डेबिट कार्डवर पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. अशाप्रकारे, या 'कार्ड टू कार्ड' ट्रान्सफरच्या मदतीने बँकेच्या शाखेत न जाता एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे पाठवता येतात. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या एटीएममध्ये अशा ट्रान्सफरची लिमिट ४० हजार रुपयांपर्यंत आहे.
3 / 9
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल एटीएम मशीनद्वारे भरू शकता. विशेषत: पेपरलेस पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिसा कार्ड कंपनीने बहुतांश बँकांच्या एटीएमवर ही सेवा दिली आहे.
4 / 9
तुम्ही तुमचा जीवन विमा प्रीमियम एटीएम मशीनवर देखील भरू शकता. एलआयसी व्यतिरिक्त, एचडीएफसी लाइफ आणि एसबीआय लाइफचे विम्याचे हप्ते एटीएम मशीनमधून भरले जाऊ शकतात.
5 / 9
तुमचे चेकबुक संपले आहे आणि तुमच्याकडे बँकेच्या शाखेत जाण्यासाठी वेळ नाही. तुमच्या या समस्येवर उपाय म्हणजे एटीएम मशिनवरील 'चेक बुक रिक्वेस्ट'चा लाभ घेऊ शकता. तुम्ही एटीएमध्ये जाऊन चेक बुकसाठी रिक्वेस्ट करू शकता.
6 / 9
जर वीज बिल असेल आणि तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला असाल, तर तुम्ही ते एटीएम मशीनमधूनच भरू शकता. देशातील बहुतांश राज्यांतील वीज मंडळांनी बँकांच्या एटीएम मशिनवर स्वत:ची लिस्ट केली आहे.
7 / 9
तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटशी संबंधित सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील. तर तुमच्या फोनवर ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्ही एटीएम मशीनची मदत घेऊ शकता.
8 / 9
तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड किंवा पिन नंबर ऑनलाइन बदलू शकता. पण, जर तुम्ही कधी एटीएममध्ये गेला असाल तर इथेही तुम्ही हे काम चांगल्या प्रकारे करू शकता.
9 / 9
'कार्ड टू कार्ड' ट्रान्सफरव्यतिरिक्त तुम्ही एटीएममधून थेट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी, तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत म्हणजेच सेव्हिंग किंवा करंट, त्या अकाउंटचा नंबर माहित असणे आवश्यक आहे.
टॅग्स :atmएटीएमbusinessव्यवसायbankबँक