₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:44 IST
1 / 9SIP Or Step Up SIP: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना, सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP). लहान बचतींनाही मोठ्या संपत्तीत रूपांतरित करण्याचा हा सर्वात पद्धतशीर आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की SIP मध्ये एक 'स्मार्ट' व्हर्जनदेखील आहे, जी तुमची कमाई आणखी जलद वाढवू शकते. 2 / 9त्याचं नाव स्टेप-अप SIP आहे. अनेकदा गुंतवणूकदार सामान्य SIP सुरू करायची की स्टेप-अप पर्याय निवडायचा या विचारात असतात. आपण आज, अगदी अचूक गणनेसह, या दोन पद्धतींमध्ये किती मोठा फरक आहे आणि कोणता पर्याय तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे लवकर गाठण्यास मदत करू शकतो हे समजून घेऊ.3 / 9सामान्य एसआयपीची संकल्पना खूप सोपी आहे. तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम, उदाहरणार्थ ₹५,०००, तुमच्या पसंतीच्या म्युच्युअल फंड योजनेत एका निश्चित तारखेला गुंतवता. ही प्रक्रिया तुम्ही निवडलेल्या कालावधीसाठी कोणताही बदल न करता चालू राहते. ही पद्धत अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांचं उत्पन्न स्थिर आहे आणि जे गुंतवणुकीत शिस्त राखू इच्छितात.4 / 9स्टेप-अप एसआयपीला टॉप-अप एसआयपी देखील म्हणतात. हा सामान्य एसआयपीचा प्रगत प्रकार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या एसआयपीच्या रकमेत दरवर्षी ठराविक टक्के किंवा रकमेनं वाढ करता. उदाहरणार्थ, जर आपण ₹ ५,००० ची एसआयपी सुरू केली आणि १०% वार्षिक स्टेप-अप निवडला तर, पहिल्या वर्षी तुमची गुंतवणूक ५००० हजार रुपये असते. दुसऱ्या वर्षी तुमची मासिक गुंतवणूक १० टक्क्यांच्या वाढीसह ५५०० रुपये, तिसऱ्या वर्षी पुन्हा १० टक्क्यांच्या वाढीसह ती ६०५० रुपये असेल.5 / 9ज्या कर्मचाऱ्यांचा पगार दरवर्षी वाढतो त्यांच्यासाठी ही पद्धत उत्तम आहे. आपल्या वाढीव उत्पन्नाचा काही भाग गुंतवणुकीत गुंतवून तुम्ही कंपाउंडिंगच्या शक्तीचा अधिक फायदा घेऊ शकता. आता आपण हिशोबाकडे वळूया. समजा तुम्ही २० वर्षांसाठी गुंतवणूक करत आहात. एसआयपीमध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळतो, असं म्हटलं जातं.6 / 9जर तुम्ही सामान्य एसआयपीमध्ये दरमहा ५ हजार रुपयांप्रमाणे २० वर्षांसाठी गुंतवणूक केली असं समजू. यावर अंदाजे १२ टक्के परतावा मिळतो असं समजू. तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम ५०००*२४०=१२,००,००० रुपये असेल. २० वर्षांनंतर गुंतवणूकदाराला एकूण ४५,९९,२८७ रुपये मिळतील. यावर एकूण नफा ३३.९९,२८७ रुपये असेल.7 / 9जर तुम्ही स्टेपअप एसआयपीमध्ये २० वर्षांसाठी दरमहा गुंतवणूक केली आणि त्यात वर्षाला १० टक्क्यांची वाढ केली तर २० वर्षांत तुम्ही अंदाजे ३४,३६,५०० रुपये गुंतवता. १२ टक्क्यांनुसार २० वर्षांनंतर तुम्हाला ९३,१५,६९२ रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला अंदाजे ५८,७९,१९२ रुपयांचा नफा मिळू शकतो.8 / 9अशाप्रकारे, तुम्ही हे समजू शकता की दरवर्षी तुमची एसआयपी थोडी वाढवून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. स्टेप-अप एसआयपीची ही खरी ताकद आहे. लक्षात ठेवा की येथे गणना अंदाजे आधारावर केली गेली आहे. बाजारातील चढउतारांनुसार ती बदलू शकते. 9 / 9(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)