1 / 7जर तुम्हाला जोखीम टाळून मोठा निधी निर्माण करायचा असेल, तर पीपीएफ हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. दरवर्षी फक्त १ लाख रुपये गुंतवून तुम्ही केवळ कर वाचवू शकत नाही तर भविष्यातील मोठ्या खर्चासाठी एक मजबूत आर्थिक पाया देखील रचू शकता.2 / 7समजा तुम्ही सध्या २५ वर्षांचे आहात आणि तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी एक मोठं स्वप्न पूर्ण करायचं आहे, जसं की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वाचवणं किंवा स्वतःचं घर खरेदी करणं. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दरवर्षी फक्त १ लाख रुपये वाचवले आणि ते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये गुंतवले तर काही वर्षांत तुम्ही सुमारे २७ लाख रुपयांचा निधी उभा करू शकता.3 / 7पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. जर तुम्ही दरवर्षी १ लाख रुपये जमा केले तर १५ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक १५ लाख रुपये होईल. यावर तुम्हाला वार्षिक ७.१ टक्के दरानं व्याज दिलं जातं. यानुसार व्याजाद्वारे तुम्ही सुमारे १२,१२,१३९ रुपये कमवाल. म्हणजे तुमच्याकडे एकूण २७,१२,१३९ रुपयांचा निधी असेल. यामध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे ही संपूर्ण रक्कम करमुक्त असेल.4 / 7पीपीएफ योजना सरकार चालवते, त्यामुळे त्यात कोणताही धोका नाही. तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि त्यावर मिळणारं व्याज देखील निश्चित असतं. शेअर बाजाराप्रमाणे त्यातही चढ-उताराचा धोका नाही. म्हणूनच ही योजना कष्टकरी लोक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये खूप लोकप्रिय आहे.5 / 7पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यानं तुम्हाला कर सवलत देखील मिळते. आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत, दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. तसेच, मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम आणि व्याज देखील करमुक्त आहे. ते EEE श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे, म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि पैसे काढण्यावर कोणताही कर आकारला जात नाही.6 / 7पीपीएफ खातं उघडणं खूप सोपं आहे. तुम्ही ते कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँक, पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे उघडू शकता. यामध्ये, एका वर्षात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते.7 / 7पीपीएफ खातं उघडणं खूप सोपं आहे. तुम्ही ते कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँक, पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे उघडू शकता. यामध्ये, एका वर्षात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते.