ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 8जर तुम्हाला बाजारातील चढउतारांची भीती वाटत असेल आणि कोणत्याही जोखीमशिवाय तुमचे पैसे वाढवायचे असतील, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ते केवळ सुरक्षितच नाही तर दीर्घकाळात उत्तम परतावा देखील देतं. जर एखाद्या व्यक्तीनं दरवर्षी पीपीएफमध्ये फक्त १ लाख रुपये जमा केले आणि हीच प्रक्रिया ३० वर्षे चालू ठेवली तर त्याला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळू शकतो.2 / 8समजा तुम्ही दरवर्षी पीपीएफमध्ये १ लाख रुपये जमा करायचे ठरवले असं समजू. सध्या पीपीएफवरील व्याजदर वार्षिक ७.१% आहे. हे व्याज दरवर्षी वाढवलं जातं, म्हणजेच तुम्हाला तुमच्या ठेवींवरच नव्हे तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळतं. म्हणूनच त्याचा दीर्घकालीन परिणाम खूप मोठा आहे.3 / 8जर तुम्ही ३० वर्षांसाठी दरवर्षी १ लाख रुपये गुंतवले तर एकूण गुंतवणूक ३० लाख रुपये होईल. परंतु व्याज जोडल्यानंतर, ३० वर्षांनी तुमच्या खात्यात एकूण १,०३,००,६०७ रुपये जमा होतील. म्हणजेच ३० लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला सुमारे ७३ लाख रुपयांचा परतावा देईल, तोही कोणत्याही जोखमीशिवाय.4 / 8पीपीएफचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कम्पाऊंडिंग म्हणजेच व्याजावर व्याज. पहिल्या वर्षी मिळालेल्या व्याजावर पुढील वर्षी मिळणारे व्याज देखील जोडलं जातं आणि हे चक्र दरवर्षी चालू राहते. पहिल्या १० वर्षात तुमचे पैसे हळूहळू वाढतात, परंतु १५ व्या वर्षानंतर ते वेगानं वाढतात आणि २५ व्या वर्षानंतर ते आणखीन वाढतात. म्हणूनच, ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा संयम आहे त्यांच्यासाठी पीपीएफ हे एक अतिशय प्रभावी आणि विश्वासार्ह साधन आहे.5 / 8जर तुम्हाला अशी गुंतवणूक हवी असेल जी पूर्णपणे सुरक्षित असेल, दीर्घकाळात चांगला परतावा देईल आणि कर वाचवेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पीपीएफची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते ईईई म्हणजेच एक्झम्पट-एक्झम्पट-एक्झम्पट श्रेणीमध्ये येते. याचा अर्थ असा की गुंतवणूक केवळ करमुक्त नाही तर व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील पूर्णपणे करातून मुक्त आहे.6 / 8 पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाला किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता. तुम्ही ही गुंतवणूक एकाच वेळी करू शकता किंवा दरमहा ती जमा देखील करू शकता. जर तुम्ही दिलेल्या वर्षात गुंतवणूक केली नाही तर तुमचं खातं 'निष्क्रिय' होऊ शकतं. अशा परिस्थितीत, ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, प्रत्येक मिसिंग वर्षासाठी ५०० रुपये गुंतवावे लागतील आणि ५० रुपये दंड भरावा लागेल. एका व्यक्तीला फक्त एकच पीपीएफ खातं उघडता येतं. मग ते पोस्ट ऑफिसमध्ये असो किंवा बँकेत. जर चुकून तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडली असतील तर ती दुरुस्त करणं आवश्यक आहे.7 / 8पीपीएफ अकाऊंट १५ वर्षांनी मॅच्युर होतं, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसे काढावे लागतील आणि खाते बंद करावे लागेल. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही ते ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी वाढवू शकता. मग ते गुंतवणुकीसह असो किंवा गुंतवणुकीशिवाय. जर तुम्ही पुढे गुंतवणूक केली तर तुम्हाला जुन्या शिल्लक आणि नवीन गुंतवणुकीवर व्याज मिळत राहील. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर किंवा मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी निधी उभारू शकता.8 / 8(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.))