Multibagger Share : ४९ रुपयांचा शेअर पोहोचला ६०० पार, या दिग्गज गुंतवणूकदारानंही केलीये यात मोठी गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 13:59 IST
1 / 7Multibagger Share : अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या अडीच वर्षांत अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे शेअर्स 49 रुपयांवरून 600 रुपयांपर्यंत वाढले आहेत.2 / 7अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सने गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना ११०० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांचीही यात मोठी गुंतवणूक आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात कंपनीचे शेअर्स 621.25 रुपयांवर व्यवहार करत होते.3 / 73 एप्रिल 2020 रोजी मुंबई शेअर बाजारावर (BSE) वर अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे शेअर्स 48.45 रुपयांवर व्यवहार करत होते. 18 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 621.25 वर व्यवहार करत होते. 4 / 7जर एखाद्या व्यक्तीने 3 एप्रिल 2020 रोजी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या रकमेचं मूल्य आज 12.82 लाख रुपये झालं असतं. वर्षभराच्या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनं 64 टक्क्यांचा परतावा दिला आहे.5 / 7कंपनीचे शेअर्स 18 नोव्हेंबर 2021 रोजी 377.35 रुपयांच्या पातळीवर होते, जे 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळच्या सत्रात 621.25 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनं जवळपास 54 टक्के परतावा दिला आहे. 6 / 7अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 745.70 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 354.50 रुपये आहे. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचौलिया यांच्याकडे या कंपनीचे 372128 शेअर्स म्हणजेच 2.49 टक्के हिस्सा आहे. 7 / 7सप्टेंबर तिमाहित कंपनीचं नेट प्रॉफिट 178 टक्क्यांनी वाढून 7.18 कोटी रुपये झालं. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ते 2.59 कोटी रुपये होतं. सुरू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहित कंपनीचा एकूण महसूल 163.44 कोटी रुपये होते. एका वर्षापूर्वी याच कालावधीत तो 121.8 कोटी रुपये होता. (टीप - यामध्ये केवळ शेअर्सबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)