1 / 12आताच्या घडीला देशासह जगभरातील अनेक घटनांचे प्रतिकूल पडसाद भारतातील शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. काही कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. एलआयसीसह अन्य कंपन्यांच्या शेअरनी गुंतवणूकदारांची निराशा केल्याचे दिसत आहे. 2 / 12मात्र, यातच कोरोना संकटातही काही कंपन्यांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. तर, काही कंपन्यांच्या शेअर्सनी कोरोना संकटानंतर रॉकेट स्पीड पकडला आहे. 3 / 12शेअर मार्केटमध्ये अशा अनेक छोट्या कंपन्या आहेत. ज्यांनी गेल्या काही महिन्यांत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत, गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सुखाल्याचे चित्र असून, यामध्ये भारतीय कंपनी असलेल्या Cressanda Solutions.4 / 12Cressanda Solutions या कंपनीचा १९ पैशांवर असलेला शेअर तब्बल ३२ रुपयांवर गेला असून, गेल्या काही ट्रेडिंगमध्ये या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागत आहे. स्मॉल कॅपमधील या कंपनीने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १६,८२१ टक्क्यांचा परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.5 / 12दोन वर्षांपूर्वी ४ जून २०२० रोजी क्रेसांडा सोल्युशन्सच्या शेअरची किंमत BSE वर फक्त १९ पैसे प्रति शेअर होती. दोन वर्षांत, शेअरने १६,८२१ टक्क्यांची झेप घेतली आणि प्रति शेअर ३२.१५ रुपयांची पातळी गाठली.6 / 12Cressanda Solutions एक वर्षापूर्वी ३१ मे २०२१ रोजी या शेअरची किंमत BSE वर फक्त ५९ पैसे होती. या समभागाने एका वर्षात ५,३४९.१५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने ३७३.४९ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी कंपनीचे शेअर्स ६.७९ रुपयांवरून ३२.१५ रुपयांपर्यंत वाढले.7 / 12क्रेसांडा सोल्युशन्सच्या शेअरमध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने ४ जून रोजी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला आता १.६९ कोटी रुपयांचा नफा झाला असता. त्याच वेळी, १ लाख रुपयांची गुंतवणूक एका वर्षात ५४.४९ लाख रुपये झाली असती.8 / 12त्याचप्रमाणे या वर्षी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या काउंटरमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याला आजमितीस ४.७३ लाख रुपयांचा नफा झाला असता.9 / 12Cressanda Solutions कंपनीला अंदाजे किंमत १५०० कोटींची एक ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने भारतात तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या संस्थात्मक ग्राहकांशी करार केला आहे.10 / 12क्रेसांडा सोल्युशन्सने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनी तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवांसह मोठे व्यावसायिक प्रकल्प नवकल्पना, डिझाइन आणि वितरित करण्यास तयार आहे.11 / 12Cressanda Solutions सॉफ्टवेअर सेवांमध्ये व्यवसाय अनुप्रयोग विकास, डेटा विज्ञान, क्लाउड, स्थलांतर, व्यवसाय प्रक्रिया ऑप्टिमायझेशन, डिजिटल मीडिया, तंत्रज्ञान अंमलबजावणी आणि देखभाल सेवा यांचा समावेश आहे.12 / 12शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची मानली जात असून, तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानंतर गुंतवणूक करणे अथवा वाढवणे हिताचे ठरू शकते, असे सांगितले जाते.