1 / 7Mother's Day 2025: मदर्स डेला आईला कोणती भेट द्यावी? जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर जरा थांबा, कारण यावेळी महागड्या भेटवस्तूंऐवजी तुम्ही आईला गुंतवणुकीची भेट देऊ शकता. होय, अशा ५ योजना आहेत ज्यात आईच्या नावावर गुंतवणूक करून तुम्ही तिला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवून भविष्य सुरक्षित करू शकता.2 / 7आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. आपलं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं अनेक जण गुंतवणूकीला प्राधान्य देतात. चला तर मग आता जाणून घेऊया अशाच ५ आर्थिक योजना ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून आपल्या आईला आर्थिक स्वातंत्र्याची अनमोल भेट देऊ शकता.3 / 7ही सरकारनं सुरू केलेली योजना आहे, जर तुमच्या आईचे वय ६० च्या आसपास असेल किंवा आधीच ६० वर्ष पूर्ण असेल तर ही योजना भन्नाट आहे, तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचं खातं सहज उघडू शकता, यात नियमित हमी उत्पन्न (तिमाही व्याज) आणि कर लाभ मिळतील. 4 / 7नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो, आपण फक्त ₹१००० पासून गुंतवणूकीला सुरुवात करू शकता आणि हे आपल्याला ५ वर्षात व्याजासह आपले पैसे परत करते.5 / 7आईला हेल्थ इन्शुरन्सची भेट दिल्यानं तुमच्या सर्व चिंताही दूर होतील. एक व्यापक आरोग्य विमा योजना जी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा कव्हर करते. या गुंतवणूकीमुळे त्यांना हॉस्पिटलच्या महागड्या बिलांपासून संरक्षण मिळेल.6 / 7जर आईचे वय ५०-५५ च्या आसपास असेल तर तुम्ही त्यांच्या नावानं बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड किंवा लार्ज कॅप फंडात एसआयपी सुरू करू शकता. एसआयपीमध्ये दीर्घकालीन महागाईवर मात करण्याची आणि चांगला परतावा मिळविण्याची क्षमता असते. एसआयपीच्या माध्यमातून आईच्या नावे होणारी छोटी बचत मोठा फंड तयार करू शकते.7 / 7ही परंपरा आणि आधुनिक गुंतवणुकीचा संगम आहे, आपण आपल्या आईसाठी भौतिक सोन्याऐवजी डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता.