म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Mira Kulkarni: 'सिंगल मदर'चे असमान्य कर्तृत्व! उभा केला 8500 कोटींचा 'स्किन केअर' बिझनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:18 IST
1 / 8शून्यातून सुरूवात करून मोठे उद्योजक बनलेल्यांच्या यादीत महिलांची नाव कमीच आहेत. यात एक नाव आहे मीरा कुलकर्णी यांचं! फाइन आर्टसमध्ये पदवी घेतलेल्या मीरा कुलकर्णींना आयुर्वेदाच्या आवडीमुळे एक कल्पना सुचली आणि त्यातूनच उभा राहिला एक मोठा उद्योग. त्यांच्या कंपनीचे प्रोडक्टस् आता देशभरात विकली जात आहेत.2 / 8मीरा कुलकर्णी या उत्तराखंडच्या रहिवासी आहेत. 45 वर्षीय मीरा कुलकर्णी या सिंगल मदर असून, अनेक आव्हानांना सामोरं जात त्यांनी हा उद्योग उभा केला. त्यांनी सुरू केलेली ही कंपनीने आज ८५०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.3 / 8मीरा कुलकर्णी यांची कंपनी आज स्किन केअर उत्पादन करणाऱ्या नामांकित कंपन्यांना टक्कर देत आहे. फॉरेस्ट इसेन्शिअल असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. आयुर्वेदिक स्किन केअर प्रोडक्ट निर्मिती करते.4 / 8मीरा कुलकर्णी यांनी चेन्नईच्या एका महाविद्यालयातून फाईन आर्ट या शाखेतून पदवी घेतली. त्यांना आयुर्वेदाबद्दल आवड आहे. त्याचबरोबर पेटिंग, पत्रकारिता आणि सेंद्रिय शेती, हर्बल कल्चर या गोष्टींमध्येही त्यांना रस आहे.5 / 8मीरा कुलकर्णी यांनी अनेक वर्ष वैद्यासोबत काम केले. आयुर्वेदिक प्रोडक्ट तयार करण्यासंदर्भात त्यांनी संशोधन केले. साबण तयार करण्यापासून फॉरेस्ट इसेन्शिअरची सुरूवात झाली. मीरा कुलकर्णी यांनी आधी आयुर्वेदिक साबण तयार केली. त्याची विक्री सुरू केली.6 / 8फॉरेस्ट इसेन्शिअलकडून तयार करण्यात येणाऱ्या साबणांची हयात रेसिडन्सीने त्यांच्या हॉटेलसाठी मोठी खरेदी केली आणि मीरा कुलकर्णी यांचे नशीब चमकले. हळूहळू त्यांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट तयार करणे आणि हॉटेल्सना विकणे सुरू केले.7 / 8आजघडीला फॉरेस्ट इसेन्शिअलच्या मालक असलेल्या मीरा कुलकर्णी यांची नेटवर्थ १२०० कोटी रुपये इतकी आहे.8 / 8फॉरेस्ट इसेन्शिअल पारंपरिक आयुर्वेदिक स्किन केअर ब्रॅण्ड आहे. ही कंपनी असा दावा करते की, त्यांच्या प्रोडक्टस् मध्ये पूर्णपणे आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो. या कंपनीचे स्किन प्रोडक्टस् हॉटेल ताज, हॉटेल ओबेराय ग्राहकांसाठी खरेदी करते.