शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की

By जयदीप दाभोळकर | Updated: May 26, 2025 09:13 IST

1 / 8
Investment Tips: जर तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील, पण नियमित उत्पन्नाचे स्त्रोत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसची एक उत्तम योजना आहे जी आपली चिंता दूर करू शकते. ही योजना तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय दरमहा पक्कं उत्पन्न देईल. जर तुम्ही तुमच्या पत्नीला यात भागीदार बनवलं तर तुम्ही घरबसल्या दरवर्षी १,११,००० रुपये कमवू शकता.
2 / 8
आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेबद्दल (Post Office Monthly Income Scheme - POMIS) सांगत आहोत. नावाप्रमाणेच, ही योजना तुम्हाला दरमहा उत्पन्न देते. यामध्ये तुम्हाला ५ वर्षांसाठी एकदा रक्कम जमा करावी लागेल. या रकमेवर उत्तम व्याजही मिळतं.
3 / 8
पोस्ट ऑफिसच्या या मंथली इनकम स्कीममध्ये (एमआयएस) तुम्ही एका खात्यात ९ लाखांपर्यंत आणि जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. सध्या या योजनेवर ७.४ टक्के व्याज मिळतं. अशा तऱ्हेनं जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत खातं उघडून १५,००,००० रुपये जमा केले तर तुम्ही वार्षिक १,११,००० रुपये आणि ५ वर्षात ५,५५,००० रुपये कमवू शकता.
4 / 8
या योजनेत तुम्ही तुमच्या पत्नीसह भाऊ किंवा कुटुंबातील सदस्यासोबत संयुक्त खातं उघडू शकता. पती-पत्नीची संयुक्त कमाई एकाच कुटुंबाचा भाग असल्यानं अधिक लाभ मिळविण्यासाठी पत्नीसोबत खातं उघडण्याचा सल्ला दिला जातो.
5 / 8
सध्या पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीमवर ७.४ टक्के दरानं व्याज मिळत आहे. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या सोबत मिळून १५ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला ७.४ टक्के व्याजानं दरमहा ९,२५० रुपये उत्पन्न मिळेल. ९,२५० x १२ = १,११,००० रुपये वार्षिक गॅरंटीड कमाई होईल. १,११,००० x ५ = ५,५५,०००... अशा प्रकारे ५ वर्षात दोघांनाही फक्त व्याजासह ५,५५,००० रुपये मिळतील.
6 / 8
जर तुम्ही सिंगल हे खातं उघडलं तर तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करू शकता. अशा तऱ्हेने तुम्हाला व्याजातून दरमहा ५,५५० रुपये मिळतील. अशा प्रकारे वर्षभरात ५,५५० x १२ = ६६,६०० रुपये व्याज म्हणून घेता येतात. ६६,६०० x ५ = ३,३३,००० रुपये, अशा प्रकारे एका खात्यातून ५ वर्षांत व्याजाच्या माध्यमातून एकूण ३,३३,००० रुपये मिळू शकतात.
7 / 8
या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला दरमहा मिळणारं व्याज तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा होत राहतं. आपण जमा केलेली मूळ रक्कम (जी आपण सुरुवातीला जमा केली होती) पूर्णपणे सुरक्षित असते. ५ वर्षांनंतर तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळते. तुम्हाला हवं असेल तर यापुढेही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्ही ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नवीन खातं उघडू शकता.
8 / 8
पोस्ट ऑफिसच्या या मासिक उत्पन्न योजनेत कोणताही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो. मुलांच्या नावानंही हे खातं उघडता येतं. जर मूल १० वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल तर त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या नावानं खातं उघडू शकतात. मूल १० वर्षांचं झाल्यावर ते स्वतःही हे खाते चालवू शकतं. लक्षात ठेवा, या योजनेत खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे बचत खातं असणं आवश्यक आहे. ओळखीसाठी आधार कार्ड आणि पॅनकार्डही द्यावं लागणार आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकPost Officeपोस्ट ऑफिस