शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही ट्रान्झेक्शन करा, ३० रुपयांचा कॅशबॅक; या UPI अ‍ॅपवर पैसे कमविण्याची मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:20 IST

1 / 7
युपीआय पेमेंट जेव्हा सुरु झालेले तेव्हा गुगल पे, पेटीएम, फोन पेवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घसघशीत कॅशबॅक दिला जात होता. हा कॅशबॅक कधी दोन रुपये, कधी चार रुपयांवर आला कळलेच नाही. नंतर तर बेटर लक नेक्स टाईमचाच मेसेज दिसायचा...
2 / 7
गेली चार-पाच वर्षे ग्राहक तर विसरूनच गेले होते. कंपन्या रमी सर्कल सारख्या अॅपचा कॅशबॅक देत होते. परंतु, सध्या एक अॅप असे आहे जे गेल्या चार-पाच दिवसांपासून जवळपास प्रत्येक मर्चंट ट्रान्झेक्शनला ३० रुपयांचा घसघशीत कॅशबॅक देत आहे.
3 / 7
चायनिजचा गाडा असेल की किराणा दुकान, १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे ट्रान्झेक्शन असेल तर तुम्हाला ३० रुपयांचा कॅशबॅक तुमच्या अकाऊंटमध्ये थेट वळता केला जाणार आहे.
4 / 7
दुकानांमधील पेमेंटसाठीचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर हा कॅशबॅक मिळत आहे. अनेकांनी या कॅशबॅकचा लाभ घेतला आहे.
5 / 7
यासाठी तुम्हाला भीम अॅप वापरावे लागणार आहे. भीम अॅपवर सध्या कॅशबॅकची लयलूट केली जात आहे. अनेकांना पाच पैकी तीन ते चार युपीआय ट्रान्झेक्शनवर प्रत्येकी ३० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.
6 / 7
यासाठी तुम्हाला आधी भीम अॅप अपडेट करावे लागणार आहे. तुम्हाला फोन पे, गुगल पे सारख्या अॅपची सवय झाली असेल. या सर्व अॅपचा वापर थांबवावा लागणार आहे.
7 / 7
झोमॅटो, स्विगी, ओलासारख्या अॅपवर तुम्हाला पेमेंट अॅप हे भीम अॅप निवडावे लागणार आहे. यानंतरच तुम्हाला हा कॅशबॅक मिळू शकतो.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र