शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

GST मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची तयारी; केंद्र सरकार सर्वसामान्यांना देणार मोठं गिफ्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:14 IST

1 / 10
जीएसटी(GST) बाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काळात मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना दिलासा मिळणार आहे.
2 / 10
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार लवकरच जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. मोदी सरकार जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे आणि सध्याचा जीएसटी स्लॅब १२ टक्क्यांवरून ५ टक्के आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
3 / 10
सरकारकडून हा निर्णय घेतला गेल्यास जीएसटी असणाऱ्या अशा सामनांवर दिलासा मिळू शकतो जे विशेष करून मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असणारे लोक घरात नियमित वापर करत असतात. हे साहित्य १२ टक्के जीएसटी स्लॅबच्या अंतर्गत येते. आता सरकार या वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा विचार करत आहे.
4 / 10
सर्वसामान्यांच्या आयुष्यात रोज वापरात येणाऱ्या वस्तू जीएसटीच्या याच वर्गात मोडतात. ज्यात १२ टक्के जीएसटी आकारला जातो. सरकार हा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के किंवा पूर्ण स्लॅबच हटवू शकते असे बोलले जाते. सरकारने हा निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
5 / 10
GST कौन्सिलच्या पुढच्या ५६ व्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. ही जीएसटी कौन्सिल बैठक या महिन्यात होण्याची शक्यता आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर आतापर्यंत १२ टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत घट होऊ शकते.
6 / 10
सध्या बूट चप्पल, मिठाई, कपडे, साबण, टूथपेस्ट, डेअरी उत्पादनसारख्या अनेक वस्तूंवर सरकारकडून १२ टक्के जीएसटी आकारला जातो. २०१७ साली देशात जीएसटी लागू करण्यात आला होता. जीएसटीबाबत जो काही निर्णय असतो तो कौन्सिलच्या बैठकीत घेतला जातो. या कौन्सिलमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रतिनिधी सहभागी असतात ते एकत्रित निर्णय घेतात.
7 / 10
भारतात सध्याच्या घडीला GST बाबत बोलायचे झाले तर ४ स्लॅब उपलब्ध आहेत. त्यात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असं वेगवेगळे वर्गीकरण करण्यात आले आहे. धान्य, खाद्य तेल, साखर, मिठाई शिवाय सोने चांदी, अन्य साहित्यही वेगवेगळ्या कॅटेगिरीत विभागले गेले आहे.
8 / 10
जीएसटीबाबत सरकारकडून दिलासा देणारे संकेत आधीपासून मिळत आहेत. मार्च महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही जीएसटी टॅक्स स्लॅबबाबत फेरविचार सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जीएसटी दरात कमी येऊ शकते असं म्हटलं होते.
9 / 10
निर्मला सीतारामन यांच्या विधानानंतर GST Tax Slab बदलण्याबाबत अनेक तर्क वितर्क सुरू होते. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच जीएसटी कौन्सिल बैठकीत सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
10 / 10
सरकार आगामी काळात जीएसटी स्लॅबमध्ये बदल करून ४ ऐवजी ३ स्लॅब आणण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
टॅग्स :GSTजीएसटीCentral Governmentकेंद्र सरकार