शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पत्नीच्या नावे ₹१,००,००० ची रक्कम जमा करून मिळेल ₹१६,००० चं फिक्स व्याज, मिळतेय सरकारची गॅरंटी

By जयदीप दाभोळकर | Updated: March 5, 2025 09:14 IST

1 / 6
Best saving schemes for Women: महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असतं. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं २०२३ मध्ये महिलांसाठी जबरदस्त बचत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना गुंतवणूकीवर जबरदस्त व्याज दिलं जातं.
2 / 6
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) नावाच्या या योजनेअंतर्गत कोणत्याही महिलेचं खातं उघडता येतं. या योजनेवर सध्या तब्बल ७.५ टक्के व्याज मिळतं, जे महिलांना इतर कोणत्याही फिक्स्ड इन्कम अल्पबचत योजनेवर मिळत नाही. या योजनेत एकरकमी रक्कम जमा केली जाते. ही योजना दोन वर्षांत मॅच्युअर होते. या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
3 / 6
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देशातील कोणत्याही बँकेत एमएसएससी खातं उघडू शकता. बँकांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खातं उघडू शकता. जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
4 / 6
परंतु या योजनेत तुम्ही तुमच्या आई आणि बहिणीच्या नावानं खातं उघडू शकता. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही एमएसएससीमध्ये तुमच्या पत्नीच्या नावानं खातं उघडून प्रचंड नफा कमावू शकता. जर तुम्ही या योजनेत तुमच्या पत्नीच्या नावावर १,००,००० रुपये जमा केले तर तुमच्या पत्नीला मॅच्युरिटीवर एकूण १,१६,०२२ रुपये मिळतील. ज्यात १६,०२२ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश आहे.
5 / 6
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सरकारी हमीसह निश्चित व्याज मिळतं. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.
6 / 6
१ एप्रिल २०२५ पासून या योजनेत गुंतवणुकीला परवानगी दिली जाणार नाही. प्रत्यक्षात या योजनेची अंतिम तारीख वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. पण १ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेच्या तारखेबाबत कोणतीही घोषणा केली नाही, त्यामुळे ३१ मार्च रोजी ही योजना बंद होणार आहे.
टॅग्स :GovernmentसरकारInvestmentगुंतवणूकnirmala sitharamanनिर्मला सीतारामन