केवळ ४ वर्षांपर्यंत जमा करावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळेल १ कोटींचं बेनिफिट; जाणून घ्या LIC च्या स्कीमबाबत
By जयदीप दाभोळकर | Updated: April 14, 2025 09:12 IST
1 / 6एलआयसी प्रत्येक वर्गातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे जीवन शिरोमणी. ज्यांची कमाई खूप चांगली आहे आणि त्यांना त्यांच्या गुंतवणुकीबद्दल सुरक्षितता हवी आहे त्यांच्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. 2 / 6एलआयसीच्या (Life Insurance Corporation-LIC) लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला फक्त ४ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये प्रीमिअमची रक्कम तुलनेत अधिक असते. जीवन शिरोमणी किमान एक कोटी रुपयांची विमा रक्कम देतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त विम्याच्या रकमेची कोणतीही मर्यादा नाही. जाणून घ्या या योजनेत आणखी काय आहे खास.3 / 6जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. यामध्ये, ४ वर्षांसाठी दरमहा ९४,००० रुपये जमा करावे लागतील. तुम्ही हा प्रीमियम दर महिन्याला, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा दरवर्षी जमा करू शकता. 4 / 6या योजनेचा लाभ घेण्यासाठी, पॉलिसीधारकाचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. जर आपण जास्तीत जास्त वयाबद्दल बोललो तर, १४ वर्षां पर्यंतच्या पॉलिसी मुदतीसाठी कमाल वय ५५ वर्षे आहे, १६ वर्षांच्या मुदतीसाठी कमाल वय ५१ वर्षे, १८ वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय ४८ वर्षे आहे आणि २० वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय ४५ वर्षे आहे.5 / 6जीवन शिरोमणी हा एक मनी बॅक प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतात. १४ वर्षांची योजना खरेदी केल्यास १० व्या आणि १२ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ३० टक्के, १६ वर्षांची पॉलिसी खरेदी केल्यावर १२ व्या आणि १४ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ३५ टक्के, १८ वर्षांची पॉलिसी खरेदी केल्यावर १४ व्या आणि १६ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ४० टक्के आणि २० वर्षांच्या मुदतीची पॉलिसी खरेदी केल्यावर १६ व्या आणि १८ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ४५ टक्के रक्कम मिळते. उर्वरित रक्कम मुदतपूर्तीनंतर एकरकमी दिली जाते.6 / 6या पॉलिसीच्या एक वर्षानंतर आणि एक वर्षाचा पूर्ण प्रीमियम भरल्यानंतर काही अटींसह कर्जाची सुविधाही दिली जाते. डेथ बेनिफिट्सही दिले जातात. पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या आधारे ग्राहक कर्ज घेऊ शकतात. वेळोवेळी ठरल्याप्रमाणे व्याजदरानं पॉलिसी लोन उपलब्ध होऊ शकतं. पॉलिसीधारकाला गंभीर आजार असल्याचं निदान झाल्यास त्यांना विम्याच्या रकमेच्या १० टक्के रक्कम एकरकमी दिली जाते. याशिवाय डेथ बेनिफिट्सचाही पॉलिसीमध्ये समावेश आहे. अधिक माहितीसाठी, आपण https://licindia.in / याची माहिती घेऊ शकता.