शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लेन्सकार्टचे चष्मे कुठे बनवले जातात, दरवर्षी किती चष्मे तयार केले जातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:07 IST

1 / 7
आयवेअर अर्थात चष्मा निर्मिती करणारी कंपनी लेन्सकार्ट प्रसिद्ध आहे. लेन्सकार्ट आता तेलंगणामध्ये देशातील सर्वात मोठा उत्पादन निर्मिती कारखाना सुरू करणार आहे. लेन्सकार्ट तब्बल १५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. २१०० नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे.
2 / 7
आयवेअर निर्मिती करणाऱ्या लेन्सकार्ट कंपनीचे देशामध्ये अनेक निर्मिती प्लांट आहेत. लेन्सकार्टचा राजस्थानातील भिवाडीमध्ये जगातील पहिली स्वयंचलित उत्पादन निर्मिती प्लांट सुरू केला.
3 / 7
त्याशिवाय दिल्ली, गुरुग्राम आणि चीनमधील झेंगझोऊमध्येही लेन्सकार्टचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत. कंपनी लवकरच आता तेलंगणात प्लांट बनवणार आहे. लेन्सकार्टचे देशभरात १४०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.
4 / 7
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार,लेन्सकार्ट दरवर्षी २५ मिलियन फ्रेम्स आणि ३० ते ४० मिलियन लेन्स बनवते.
5 / 7
लेन्सकार्ट कंपनीचे व्हॅल्यूएशन नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५.६ बिलियन डॉलर इतकं आहे. २०२५ वर्ष संपेपर्यंत त्यात २० टक्के नफा होण्याचा अंदाज आहे. आर्थिक वृद्धी आणि कमी वेळेत जास्त लोकप्रिय झाल्याबद्दल लेन्सकार्टला स्टार्टअप ऑफ द इअर पुरस्कारही मिळालेला आहे.
6 / 7
लेन्सकार्टची सुरूवात २०१० मध्ये झाली होती. पीयूष बन्सल यांनी अमित चौधरी आणि सुमित कपाही यांच्यासोबत कंपनी उभी केली. पीयूष बन्सल पूर्वी अमेरिकेत मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करत होते.
7 / 7
२००८ मध्ये अमेरिकेतली नोकरी सोडून ते भारतात आले. त्यांनी कोलकातातील त्यांचा मित्र अमितला व्यवसायाची कल्पना सांगितली. याबद्दल विचार करत असतानाच त्यांनी लिंक्डइनवर सुमित कपाही यांना शोधले आणि लेन्सकार्टची सुरूवात केली.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMarketबाजार