ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जाणून घ्या, बदललेल्या नियमांमुळे चालू खात्यातून किती पीएफ काढता येतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 23:21 IST
1 / 6प्रॉव्हिडंट फंड(PF)संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वीच सरकारनं काही बदल केले आहेत. आता कोणालाही पीएफ काढायचा असल्यात त्याला ऑनलाइन दावा करावा लागणार आहे. 2 / 6आपण खात्यातून किती पीएफची रक्कम काढू शकता हे आपल्या स्थितीवर निर्भर आहे. जर मूल, भाऊ/बहिणीच्या लग्नासाठी पीएफ काढायचा असल्यास आपल्याला 50 टक्के पीएफ काढता येणार आहे. 3 / 6पत्नी किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ खात्यातील 50 टक्के रक्कम व्याजासकट काढू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला नोकरी करून सात वर्षं पूर्ण झालेली असली पाहिजेत. 4 / 6जर आपल्याला घर किंवा जमीन खरेदी करायची आहे आणि आपल्या नोकरीला पाच वर्षं पूर्ण झालेली आहेत. तर काही अटी-शर्थींच्या माध्यमातून पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी अर्ज करता येतो.5 / 6प्लॉट खरेदीसाठी आपण मासिक वेतनातून 24 टक्के आणि घर खरेदीसाठी मासिक वेतनातून 36 टक्के पीएफ काढता येतो. अशा प्रकारात आप व्याजाच्या रकमेसाठीही क्लेम करू शकता. 6 / 6जर स्वतःचा, पत्नी, मुलं किंवा आई-वडिलांच्या उपचारासाठी पैसे काढायचे असल्यास आपल्याला वेतनाच्या 6 टक्के रक्कम काढता येते. एखाद्या गंभीर आजारावरच्या उपचारासाठीही आपण खात्यातून पैसे काढू शकता. त्यासाठी रुग्णालयातील बिल, मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागते.