By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:24 IST
1 / 8कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक टीका केली. यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी कामरा यांचा कार्यक्रम झालेला स्टुडिओची तोडफोड केली.2 / 8स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वादात सापडण्याची कुणाल कामरा यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कुणाल कामरा आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत आला आहे. पण, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.3 / 8कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन आहे. २०१७ मध्ये त्यांनी यूट्यूबवर पॉडकास्ट (मुलाखत) कार्यक्रमाची सुरुवात केली. २०१७ मध्येच त्यांनी शट अप या कुणाल Shut Up Ya Kunal) हा शो सुरू केला होता. 4 / 8हा शो तुफान लोकप्रिय झाला. यामुळेच ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. त्यावेळी कुणाल यांनी अरविंद केजरीवाल, रवीश कुमार, असदुद्दीन ओवेसी, कन्हैया कुमार, ओमर खालिद, शेहला रशीद, जिग्नेश मेवाणी इत्यादी लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या.5 / 8कुणाल कामरा आपल्या वक्तव्यामुळे वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्याशी त्यांचा जोरदार वाद झाला होता. ओला स्कूटरच्या सेवेवरून कामरा यांनी टिपण्णी केली होती.6 / 8याआधी २०२० मध्ये फ्लाइटने प्रवास करताना त्यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावरही टिप्पणी केली होती. यानंतर इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईसजेटने कुणाल कामरा यांना त्यांच्या विमानातून ६ महिन्यांसाठी प्रवास करण्यास बंदी घातली होती.7 / 8कुणाल कामरा यांचा यूट्यूब आणि सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर त्यांचे २३.१ लाख सबस्क्राइबर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्याही १० लाख आहे. प्रत्यक्षात ते फक्त १२ लोकांना फॉलो करतात. यामध्ये कन्हैया कुमार, वरुण ग्रोवर, श्याम रंगीला आदींचा समावेश आहे. X वर त्याच्या फॉलोअर्सची संख्या २४ लाख एवढी आहे.8 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुणाल यांची कमाई यूट्यूब, सोशल मीडिया आणि शोच्या माध्यमातून येते. प्रत्येक शोसाठी ते १२ ते १५ लाख रुपये घेतात. कुणाल कामरा यांच्या एकूण संपत्तीचा कोणताही अचूक आकडा नाही. पण ती १ कोटी ६ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.