JioCinema प्रीमियम प्लान: ₹१ पेक्षा कमीमध्ये सबस्क्रिप्शन, बिघडवणार का Netflix आणि Amazon Prime खेळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 10:19 IST
1 / 8JioCinema OTT Plans : JioCinema ने भारतीय बाजारपेठेतील इतर ओटीटी प्लॅटफॉर्मशी (OTT Platforms) स्पर्धा करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. कंपनीनं आपले नवीन प्लान लॉन्च केले आहेत. यामध्ये JioCinema प्रीमियम अॅक्सेस दिला जातो. या प्लॅनची किंमत २९ रुपयांपासून सुरू होते. मुकेश अंबानींच्या कंपनीनं या किमतीत प्लॅन लॉन्च करून इतर प्लॅटफॉर्मसाठी आव्हान निर्माण केलं आहे.2 / 8ज्या प्रकारे जिओच्या एन्ट्रीनंतर टेलिकॉम क्षेत्रात सर्वांचे धाबे दणाणले होते, त्याप्रमाणे ओटीटीमध्येही जिओ असंच करणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जिओसाठी असं करणं शक्य आहे का? पाहूया जिओ सिनेमा आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या डिटेल्स.3 / 8जिओने दोन नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत, जे मंथली व्हॅलिडीटीसह येतात. कंपनीनं २९ रुपये आणि ८९ रुपयांचे प्लान लॉन्च केले आहेत. दोन्ही प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह येतात. २९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त एकाच डिव्हाइसवर JioCinema ॲक्सेस करू शकता.4 / 8तर ८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्ही चार डिव्हाइसवर ॲक्सेस करू शकता. याशिवाय कंपनी ९९९ रुपयांचा प्लान देखील ऑफर करते. हा प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसह येतो.5 / 8Amazon Prime Videos साठी चार स्कीम्स आहेत. कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन २९९ रुपयांचा आहे. यामध्ये एका महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळतं. तर तीन महिन्यांचा प्लॅन ५९९ रुपयांचा तर अॅन्युअल प्लॅन १४९९ रुपयांचा आहे. कंपनीनं ७९९ रुपयांचा प्लॅनही लॉन्च केला आहे. Amazon प्राइम सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्राइम म्युझिकसह प्राइम व्हिडिओ, प्राइम शॉपिंग फायदे आणि इतर अनेक फायदे मिळतात.6 / 8Netflix च्या पोर्टफोलिओमध्ये चार प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन १४९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये 480P व्हिडिओ उपलब्ध आहेत. हा प्लान फक्त मोबाइल युझर्ससाठी आहे. तर बेसिक प्लान १९९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये एचडी कॉन्टेंट ॲक्सेस केला जाऊ शकतो. तिसरा प्लॅन ४९९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्ही 1080P व्हिडिओ पाहू शकता. या प्लॅनमध्ये तुम्ही एकावेळी दोन डिव्हाईसेसवर Netflix ॲक्सेस करू शकता. तर सर्वात महाग प्लान ६४९ रुपयांचा आहे. यामध्ये तुम्ही ४ डिव्हाईसेसवर अॅक्सेस करू शकता. परंतु नेटफ्लिक्स अकाऊंट शेअरिंगची सुविधा देत नाही.7 / 8दूरसंचार क्षेत्राप्रमाणे जिओ ओटीटी सेगमेंटमध्ये बदल घडवून आणू शकेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. परंतु तशी शक्यता यात थोडी कमी दिसून येते. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील एकसारख्या सेवांची उपलब्धता. म्हणजेच येथे सर्व ऑपरेटर फक्त कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा देतात.8 / 8ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्मवर वेगवेगळा कॉन्टेंट पाहायला मिळेल. याचा अर्थ, तुम्ही JioCinema वर Netflix वर उपलब्ध असलेला कॉन्टेंट पाहू शकत नाही. अशा परिस्थितीत दूरसंचार क्षेत्राप्रमाणे येथे बदल करणं जिओला शक्य नाही. परंतु स्वस्त प्लॅनच्या मदतीनं कंपनी निश्चितपणे आपली ग्राहक संख्या वाढवू शकते.