Jio चा धमाका; नवीन Recharge Plan लाँच, Disney+ Hotstar चे मिळेल प्रीमियम सब्सक्रिप्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:14 IST
1 / 8देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर जिओने (Jio) नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन ( Prepaid Recharge Plan) लॉन्च केले आहेत. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन रिचार्ज योजना जोडल्या आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना Disney + Hotstar चे प्रीमियम (Premium) सब्सक्रिप्शन मिळेल. 2 / 8या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉल, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्ससह Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. कंपनीने दोन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. 3 / 8दरम्यान, Disney + Hotstar च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये युजर्सला 4K कंटेंट मिळते. या सबस्क्रिप्शन अंतर्गत युजर्स Disney+ Hotstar ला मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट आणि कनेक्टेड टीव्हीवर वापरू शकतात. 4 / 8Jio च्या 1499 च्या रिचार्ज प्लॅनमध्ये, युजर्सला Disney + Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मिळते. यासोबतच प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS उपलब्ध आहेत. 5 / 8या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याशिवाय, तुम्हाला Jio Apps चे सबस्क्रिप्शन देखील मिळते. दुसरीकडे, जर आपण 4199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोललो, तर त्यात एक वर्षासाठी Disney + Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 6 / 8यासोबतच ग्राहकांना दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला Jio Apps चे सब्सक्रिप्शन देखील मिळेल. दरम्यान, Disney+ Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत 1499 रुपये आहे. 7 / 81499 रुपये किंवा 4199 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला Disney + Hotstar ची प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. यासाठी तुम्हाला एक कूपन कोड दिला जाईल, जो My Jio अकाऊंटमध्ये येईल. हा कोड वापरून तुम्ही एका वर्षासाठी फ्री सर्व्हिस मिळवू शकता.8 / 8यासाठी तुम्हाला https://www.hotstar.com/in/subscribe/promo वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या Jio नंबरने साइन इन करावे लागेल आणि नंतर OTP टाकावा लागेल. यानंतर यूजर्सला युनिक कूपन कोड टाकावा लागेल. कन्फर्मेशननंतर, तुमचे सबस्क्रिप्शन अॅक्टिव्ह होईल.