शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:06 IST

1 / 7
कार खरेदी करताना रोख रक्कम भरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे असे अनेकांना वाटते, परंतु प्रत्यक्षात, कर्जावर कार खरेदी करणे अधिक फायदेशीर कसे ठरते ते जाणून घेऊ...
2 / 7
रोख रकमेचा हा आहे फायदा: जर तुम्ही रोखीने कार खरेदी केली तर तुमच्याकडील रोख रक्कम कमी होते. मात्र कर्ज काढून घेतली तर तुम्ही दरमहा ईएमआय भरू शकता आणि उर्वरित पैसे गुंतवणूक किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी वाचवू शकता.
3 / 7
टॅक्स वाचतो का ? : जर कार व्यवसायासाठी वापरली जात असेल, तर कार कर्जाच्या ईएमआयच्या व्याजाचा भाग कर कपात म्हणून दावा केला जाऊ शकतो. यामुळे तुमचा टॅक्स वाचू शकतो.
4 / 7
क्रेडिट स्कोअर मजबूत होतो: वेळेवर ईएमआय भरल्याने तुमचा सिबील स्कोअर वाढतो. यामुळे भविष्यात कर्ज घेणे सोपे होते.
5 / 7
सवलती आणि ऑफर : सणासुदीच्या काळात किंवा ऑफर्सदरम्यान बँका आणि डीलरशिप दोन्हीकडून कार कर्जावर सवलती, कमी व्याजदर किंवा कॅशबॅक दिले जातात, ज्यामुळे कर्ज घेणे अधिक फायदेशीर ठरते.
6 / 7
विमा, अतिरिक्त फायदे : जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला मोफत विमा, रोडसाइड असिस्टंट किंवा अतिरिक्त वॉरंटीसारखे फायदे मिळतात, जे रोख पेमेंटवर उपलब्ध नसतात.
7 / 7
हे लक्षात ठेवा : व्याजदरांची तुलना करा I ईएमआय उत्पन्नाच्या ४० टक्के पेक्षा जास्त नसावा I वेळेवर पैसे भरा आणि दंडाचा धोका टाळा.
टॅग्स :carकारbankबँकInvestmentगुंतवणूकMONEYपैसा