IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:19 IST
1 / 6जर तुम्हाला जगभर भटकायला आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयआरसीटीसीच्या या उत्कृष्ट टूर पॅकेजमध्ये तुम्ही आशियातील एका सुंदर देशाला भेट देऊ शकता. या टूर पॅकेजचे नाव आहे “SPLENDOURS OF JAPAN-CHERRY blossom” असून त्याचा कोड SMO63 आहे. या अफलातून सहलीबद्दल आणखी जाणून घेऊया.2 / 6IRCTC च्या टूरला २० मार्च २०२५ रोजी चेन्नईपासून सुरुवात होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला ७ रात्री आणि ८ दिवस जपानमधील खास ठिकाणच सफर घडवली जाणार आहे. या ७ दिवसांच्या सहलीत तुम्हाला टोकियो, हाकोने, हमामात्सू, हिरोशिमा आणि ओसाका या प्रसिद्ध शहरांना भेट देण्याची संधी मिळेल.3 / 6यासोबत तुम्हाला माउंट फुजी, असाकुसा मंदिर, योयोगी पार्क चेरी ब्लॉसम, एमटी फुजी 5 वे स्टेशन, टोयोटा म्युझियम, स्कामाग्लेव्ह आणि रेल्वे पार्क आणि किंकाकू-जी (गोल्डन पॅव्हेलियन) ला भेट देण्याची संधी देखील मिळेल.4 / 6या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. यामध्ये खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था, उत्तम हॉटेल्समध्ये राहण्याची सुविधा, प्रवास विमा (विमा कवच), लोकल प्रवासासाठी बस सुविधा, यासोबतच तुम्हाला प्रत्येक ठिकाणाची माहिती प्रवाशांना देणारा मार्गदर्शकही मिळेल.5 / 6या टूर पॅकेजची किंमत एका व्यक्तीसाठी ३,९०,६०० रुपये आहे. दोन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती २,९८,५०० रुपये आहे. तीन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती २,९३,५०० रुपये आहे. ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी (बेडसह) २,६४,५०० रुपये आहे. तर ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी (विनाबेड) २,४१,६०० रुपये आहे.6 / 6तुम्हाला या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC च्या लिंकवर जाऊन माहिती मिळवू शकता.