1 / 6पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. पण आता आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. २९ मार्च २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत CBDT ने म्हटले होते की, ३१ मार्च २०२२ नंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ५०० रुपये दंड भरावा लागेल. 2 / 6अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने ३० जून २०२२ पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर त्याला ५०० रुपयांऐवजी अधिक दंड भरावा लागेल. CBDT ने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की जर करदात्यांनी ३० जून २०२२ पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले तर त्यांना ५०० रुपये दंड भरावा लागेल.3 / 6१ जुलै किंवा त्यानंतर जे करदात्यांनी त्यांचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक केले त्यांना ५०० रुपयांऐवजी १००० रुपये दंड भरावा लागेल. हे पेमेंट चलन क्रमांक ITNS २८० द्वारे केले जाईल. 4 / 6जर करदात्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकले नाहीत, तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे लवकरात लवकर पॅन कार्ड आणि आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे.5 / 6आधार पॅन लिंक करण्यासाठी www.incometax.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर Quick लिंक सेक्शनमध्ये आधार ऑप्शनवर जा. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. तुम्ही तुमच्या पॅन, आधारसोबत नाव आणि मोबाइल नंबरची माहिती द्या.6 / 6सर्व माहिती योग्य पद्धतीनं भरल्यावर 'I Validate My Aadhaar Details' ऑप्शनवर जा. त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून व्हॅलिडेट वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा दंड भरा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पॅन आधार लिंक होईल.