देशात नेमकं किती लोक कमावतात वार्षिक १०० कोटी? अन् किती लोक आहेत गरीब; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:19 IST
1 / 7केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी एका प्रश्नावर लेखी स्वरुपात उत्तर देताना राज्यसभेत एक महत्वाची माहिती दिली. 2 / 7आयकर विभागातील माहितीनुसार देशात वार्षिक १०० कोटींचं उत्पन्न दाखवलेल्या नागरिकांची संख्या २०२०-२१ या वर्षात १३६ इतकी झाली आहे. 3 / 7देशात वार्षिक १०० कोटींचं उत्पन्न कमावणाऱ्या व्यक्तींचा आकडा यंदाच्या वर्षात १३६ इतका झाला आहे. याआधी २०१९-२० सालात हा आकडा १४१ इतका होता. तर २०१८-१९ या वर्षात हा आकडा ७७ इतका होता. 4 / 7लॉकडाऊन काळात देशातील कोट्याधीश लोकांच्या संख्येत वाढ झालीय का? असा सवाल राज्यसभेत विचारण्यात आला होता. याच्या उत्तरात अर्थमंत्रालयाकडून लेखी स्वरुपात सविस्तर माहिती देण्यात आली. 5 / 7अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डकडे (सीबीडीटी) उपलब्ध माहितीनुसार प्रत्यक्ष कराअंतर्गत अब्जाधीश शब्दाची कोणतीही वैधानिक किंवा प्रशासकीय परिभाषा नमूद नाही. 6 / 7तेंडुलकर समितीच्या कार्यप्रणालीचं अनुकरण करताना भारतात दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींची संख्या २०११-१२ साली २७ कोटी इतकी होती. 7 / 7''सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'' यावर जोर देण्यासोबतच विविध योजनांच्या अंमलबजावणी करुन देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा करणं हे सरकारचं लक्ष्य असल्याचंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.