गृहिणींनो लक्ष द्या, महिन्याला केवळ ₹१००० ची बचत; काही वर्षांतच बँक खात्यात जमू शकतात ₹१०,००,०००, पाहा कसं
By जयदीप दाभोळकर | Updated: March 15, 2025 09:06 IST
1 / 7Investment Mutual Funds: आजकाल अनेक जण गुंतवणूकीचा मार्ग अवलंबत आहेत. भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. भविष्यातील अनेक गरजा या गुंतवणूकीच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाऊ शकतात. बचतीच्या बाबतीत गृहिणींचा हात कोणीही धरू शकत नाही. घर सांभाळताना त्या मोठ्या हुशारीनं बचतही करत असतात. 2 / 7पण जर तुम्ही दर महिन्याला फक्त १००० रुपयांची बचत करून गुंतवणूक केली तर तुम्ही स्वत:साठी १०,००,००० रुपयांचा बॅलन्स देखील तयार करू शकता. म्हणजे घरबसल्या फक्त थोड्या बचतीतून तुम्ही स्वत:साठी एवढी मोठी रक्कम जोडू शकता. हे कसं करू शकता ते समजून घेऊ.3 / 7आजकाल गुंतवणुकीच्या दृष्टीने म्युच्युअल फंड हा ही उत्तम पर्याय मानला जातो. बाजाराशी निगडित असूनही थेट शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जोखीम कमी मानली जाते. केवळ ५०० रुपयांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला मुद्दलासह कंपाऊंडिंग म्हणजेच व्याजावरील व्याजाचा लाभ मिळतो. 4 / 7अशावेळी तुम्ही जितका जास्त काळ एसआयपी चालवाल तितका चांगला नफा कमवाल. साधारणपणे त्यावर १२ टक्क्यांचा परतावा मिळतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. परंतु कधी कधी तो १५ ते २० टक्क्यांपर्यंतही मिळू शकतो. त्यात चांगला नफा कमावण्यासाठी दीर्घ काळ गुंतवणूक करावी लागते. त्यात १५ ते २० वर्षे गुंतवणूक केल्यास थोडी फार रक्कम गुंतवून मोठा नफा कमावू शकता आणि कोट्यधीश बनू शकता.5 / 7जर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दरमहा १००० रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही वार्षिक १२,००० रुपयांची गुंतवणूक कराल. जर तुम्ही सलग २० वर्षे ही गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्ही एकूण २,४०,००० रुपयांची गुंतवणूक कराल, पण १२ टक्के व्याजानं तुम्हाला फक्त व्याज म्हणून ६,७९,८५९ रुपये मिळतील. अशा प्रकारे २० वर्षांनंतर तुम्हाला एकूण ९,१९,८५७ रुपये म्हणजेच जवळपास १० लाख रुपये मिळतील.6 / 7तर १४ टक्के नफा मिळाल्यास मॅच्युरिटीची रक्कम ११,७३,४७४ रुपये होईल आणि १५ टक्के परतावा मिळाल्यास मॅच्युरिटीवर १३,२७,०७३ रुपये मिळतील. म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही १००० रुपयांची मासिक गुंतवणूक करून अवघ्या २० वर्षांत किमान १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जोडू शकता.7 / 7टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.