1 / 8Hinduja Group News: इस्रायल इराणमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इस्रायलपाठोपाठ अमेरिकेनंही त्यांना लक्ष्य केलं. आज इराणमधील परिस्थिती निराळी असली असली तरी १९७९ पूर्वी इराणमध्ये पाश्चिमात्य प्रभाव होता. हिंदुजा समूह हा भारतातील अग्रगण्य औद्योगिक घराण्यांपैकी एक असून त्याचं मुख्यालय तेहरानमध्ये सुमारे सहा दशकांपर्यंत होतं. 2 / 8परंतु इस्लामी क्रांतीनंतर हिंदुजा समूहाने आपलं मुख्यालय लंडनला हलवलं आणि आज हिंदुजा हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. त्याची एकूण संपत्ती सुमारे ३५.३ अब्ज पौंड इतकी आहे. हिंदुजा ग्रुप ४८ देशांमध्ये कार्यरत असून दीड लाखांहून अधिक लोकांना रोजगार देतो.3 / 8हिंदुजा समूहाच्या भारतात सहा लिस्टेड कंपन्या आहेत. यामध्ये ऑटो कंपनी अशोक लेलँड्स आणि इंडसइंड बँकेचाही समावेश आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड या समूहातील कंपनीनं दिवाळखोरी प्रक्रियेत अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल नुकतीच विकत घेतली.4 / 8हिंदुजा समूहाची स्थापना सिंधमधील शिकारपूर शहरातील तरुण उद्योजक परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी १९१४ मध्ये केली. १९१९ मध्ये कंपनीनं इराणमध्ये आपलं ऑफिस उघडलं. त्यानंतर पुढची ६० वर्षे या कंपनीचं मुख्यालय इराणमध्येच होतं.5 / 8पण १९७९ मध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीमुळे इराणच्या शहाचा पाडाव झाला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हिंदुजा समूहानं आपलं मुख्यालय इराणबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढे ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मर्चंट बँकिंग आणि ट्रेडिंगपासून या ग्रुपची सुरुवात झाली. आज ऑटो, आयटी, मीडिया आणि एंटरटेनमेंट, ऑइल अँड स्पेशालिटी केमिकल्स, बँकिंग अँड फायनान्स, पॉवर जनरेशन, रिअल इस्टेट आणि हेल्थकेअर अशा अनेक क्षेत्रांमध्ये कंपनीचा व्यवसाय विस्तारला आहे.6 / 8१९७१ मध्ये परमानंद दीपचंद यांच्या निधनानंतर त्यांच्या चार मुलांनी हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय जगभर वाढवला. अशोक लेलँड ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे जगभरात सुमारे १० उत्पादन युनिट आहेत. या कंपनीने १९९७ मध्ये भारतातील पहिली सीएनजी बस लाँच केली.7 / 8१९९४ मध्ये हिंदुजा ग्रुपनं भारतातील बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला. २००० मध्ये हिंदुजा ग्रुपनं हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सची स्थापना केली. ही ग्रुपची बीपीओ कंपनी आहे. हिंदुजा ग्रुपनं सुप्रसिद्ध ब्रँड गल्फ देखील विकत घेतला आणि नंतर त्याचे नाव गल्फ ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड असं ठेवलं.8 / 8हिंदुजा बंधूंमधील सर्वात मोठे असलेल्या श्रीचंद पी हिंदुजा यांचं मे २०२३ मध्ये निधन झालं. आता समूहाची धुरा त्यांचे धाकटे भाऊ गोपीचंद हिंदुजा यांच्याकडे आहे. त्यांचे भाऊ प्रकाश पी हिंदुजा हे युरोपमधील हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष आहेत तर धाकटे भाऊ अशोक हिंदुजा हे भारतातील हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. गोपीचंद हे लंडनमध्ये राहतात, प्रकाश हे मोनाकोमध्ये आणि अशोक भारतात राहतात. काही वर्षांपूर्वी या कुटुंबात वाद झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं.