तुम्ही आरोग्य विम्याच्या प्लानमध्ये हे 'एक्ट्रा बेनिफिट' घेतले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:44 IST
1 / 7हेल्थ इन्शुरन्स घेताना अनेकजण प्लानमध्ये अतिरिक्त फायदे (एक्स्ट्रा बेनिफिट्स) घ्यायला विसरतात. यांनाच रायडर्स असेही म्हटले जाते.2 / 7फक्त बेसिक पॉलिसीमध्ये हे लाभ दिले जात नाहीत. पुढीलप्रमाणे रायडर्स घेतले नसल्यास उपचारावेळी मोठा खर्च होऊ शकतो.3 / 7'मॅटर्निटी रायडर' डिलिव्हरी, प्री-नेटल (गर्भधारणेदरम्यानची तपासणी), पोस्ट-नेटल (डिलिव्हरीनंतरची काळजी) आणि काही वेळा नवजात बाळाच्या उपचाराचा खर्च कव्हर करतो.4 / 7'क्रिटिकल इलनेस रायडर' कव्हरमध्ये जर तुमच्या कुटुंबात हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार यासारख्या गंभीर आजारांची हिस्ट्री असेल, तर हा कव्हर घेणे समजूतदारपणाचे ठरेल.5 / 7'हॉस्पिटल कॅश कव्हर' उपचारात दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशनची शक्यता असल्यास उपयोगी ठरतो. कंपनी प्रत्येक दिवसाच्या हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी ठराविक रक्कम देते.6 / 7'रुम रेंट वेवर' रायडर घेतल्यास पसंतीच्या कोणत्याही रूममध्ये राहू शकता, त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागत नाही.7 / 7'ओपीडी रायडर'मध्ये डॉक्टरांची फी आणि टेस्टचा खर्च कव्हर केला जातो. तुम्हाला वारंवार डॉक्टरकडे जावे लागत असेल, तर ओपीडी रायडर खूप उपयोगी ठरतो.