शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय सर्वाधिक टॅक्स कशासाठी देतात? समोर आली संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:16 IST

1 / 5
येत्या १ फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या आशा आहेत. देशात टॅक्स हा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक गोष्टींवरील टॅक्स कमी करण्याची मागणी केली जात आहे. या अर्थसंकल्पात टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, भारतीय सर्वाधिक कर कशावर देतात हे तुम्हाला माहितीय का?
2 / 5
सध्या देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अंतर्गत, वस्तू आणि सेवा वेगवेगळ्या स्लॅबमध्ये विभागल्या आहेत. २०१७ मध्ये जीएसजी लागू करण्यात आला त्यावेळी २२६ उत्पादने २८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये होती. कालांतराने याची संख्या ३५ उत्पादनांपर्यंत मर्यादीत करण्यात आली आहेत.
3 / 5
यामध्ये प्रामुख्याने लक्झरी वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. सिमेंट, ऑटोमोबाईल पार्ट्स, टायर, मोटार वाहन उपकरणे, तंबाखू, सिगारेट, पान मसाला, विमान सारख्या विशेष वस्तूंचा यात समावेश आहे.
4 / 5
काही वर्षांपूर्वी, २८% कर स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या १५ वस्तू १८% कर स्लॅबमध्ये आणण्यात आल्या. यामध्ये वॉशिंग मशिन, २७ इंची टीव्ही, व्हॅक्यूम क्लिनर, फ्रीज आणि पेंट या वस्तूंचा समावेश होता. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
5 / 5
पेट्रोल आणि डिझेल सध्या जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार त्यानुसार व्हॅट आणि इतर कर लादतात. जर त्याचा GST मध्ये समावेश करुन २८% स्लॅबमध्ये ठेवले. तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय घट होऊ शकते. या कराच्या ओझ्याचा विशेषत: सामान्य जनता आणि उद्योगांवर परिणाम होतो.
टॅग्स :GSTजीएसटीIncome Taxइन्कम टॅक्सIncome Tax Slabआयकर मर्यादा