शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! सोनं-चांदी स्वस्त झालं, फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 1:39 PM

1 / 9
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किंमती ५९ हजार रुपयांवर पोहोचल्या होत्या, आता या आठवड्यात सोनं- ५८ हजार रुपयांवर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
2 / 9
सोमवारी सकाळी, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सोने MCX एक्सचेंजवर ५८८८४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या घसरणीसह उघडले.
3 / 9
गेल्या शुक्रवारी संध्याकाळी ५८९४६ रुपयांवर बंद झाला होता. ५ डिसेंबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी सोने आज ५९३५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या घसरणीसह उघडले. शुक्रवारी संध्याकाळी तो ५९३९५ रुपयांवर बंद झाला.
4 / 9
सोमवारी चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. MCX वर सोमवारी सकाळी, चांदीची किंमत ७३२५१ रुपये प्रति किलो घसरून उघडले. शुक्रवारी संध्याकाळी तो ७३३३७ रुपयांवर बंद झाला. तर ५ डिसेंबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत ७४६७४ रुपये प्रति किलोवर उघडले.
5 / 9
सोमवारी सोन्याच्या जागतिक किमतीतही घसरण दिसून येत आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.१६ टक्क्यांनी कमी होऊन १,९४२.४० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस १९२३.४४ डॉलरवर व्यवहार करताना दिसून आली.
6 / 9
कॉमेक्सवरील चांदीची जागतिक वायदा किंमत सोमवारी घसरत असल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळी कॉमेक्सवर चांदी ०.३५ टक्क्यांनी कमी होऊन २३.७६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती.
7 / 9
चांदीची जागतिक स्पॉट किंमत देखील घसरली आणि २३.५० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली.
8 / 9
गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज सकाळपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सोन्याचा भाव सध्या ५९ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली आहे.
9 / 9
सोन्या-चांदीचे दर दररोज बदलत असतात. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दराच मोठी वाढ सुरू आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी