शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 21:27 IST

1 / 10
देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यात काही अल्प बचत योजनांचाही समावेश आहे. ज्यांत, सर्वसामान्य लोक छोट्या-छोट्या स्वरुपात पैसे जमवत असतात. यावर निश्चित स्वरुपात परतावाही मिळतो आणि पैसाही सुरक्षित राहतो.
2 / 10
या बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या अनेक बचत योजनांचा समावेश आहे. जर तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
3 / 10
आता केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी पीपीएफ आणि एनएससीसह विविध अल्प बचत योजनांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने, १ जुलै २०२५ पासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही.
4 / 10
अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे की, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जी १ जुलै २०२५ पासून सुरू होऊन ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपेल) विविध अल्प बचत योजनांवरील व्याजदर जसे आहेत तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
5 / 10
कोणत्या योजनेत किती व्याज? - अधिसूचनेनुसार, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींवर ८.२ टक्के व्याजदर मिळेल. तर तीन वर्षांच्या मुदठेवींवरील दर चालू तिमाहीतही ७.१ टक्केच राहील.
6 / 10
लोकप्रिय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव योजनांवरील व्याजदर देखील अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के ठेवण्यात आले आहेत. किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल आणि गुंतवणूक ११५ महिन्यांत परिपक्व होईल...
7 / 10
...तसेच, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर १० टक्के असेल. तर, एप्रिल-जून २०२५ या कालावधीसाठी बचत प्रमाणपत्रावरील (एनएससी)व्याजदर ७.७ टक्के एवढा राहील.
8 / 10
याशिवाय, चालू तिमाहीप्रमाणेच, यावेळीही मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकदारांना ७.४ टक्के व्याज मिळेल. महत्वाचे म्हणजे, सलग पाचव्या तिमाहीत पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु अथवा अल्प बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
9 / 10
सरकारने गेल्या वेळी २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी काही योजनांमध्ये बदल केले होते. सरकार दर तिमाहीला अल्प बचत योजनांवरील व्याजदर अधिसूचित करते असते.
10 / 10
सरकारने गेल्या वेळी २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी काही योजनांमध्ये बदल केले होते. सरकार दर तिमाहीला अल्प बचत योजनांवरील व्याजदर अधिसूचित करते असते.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकPPFपीपीएफNarendra Modiनरेंद्र मोदीMONEYपैसा