Petrol Diesel Price: खुशखबर! निवडणूक निकालांनंतर, महाग नाही, स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल; आणखी कमी होणार दर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:07 IST
1 / 8पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेल महाग नाही, तर स्वस्त झाले आहे. हे वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल, परंतु हे खरे आहे. 2 / 8देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर अगदी एक रुपया प्रतिलीटरने कमी झाले आहेत. खरे तर, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.3 / 812 ते 16 रुपयांनी वाढण्याची होती शक्यता - कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाच, पेट्रोलचे दर 12 ते 16 रुपये प्रतिलीटरपर्यंत वाढती, असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते. मात्र, आता दर कमी झाल्याने ग्राहक खुश दिसत आहेत. 4 / 8आगामी कळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दोनच दिवसांत कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर प्रति बॅरलवरून घसरून 108.7 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.5 / 8कोणत्या शहरात किती कमी झाला दर - शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये पेट्रोलचा दर कमी होऊन 102.27 रुपयांवरून 101.81 रुपये प्रति लीटरवर आला आहे. जयपूरमध्ये 108.07 रुपयांवरून 107.06 रुपये प्रति लीटरवर आला आहे. 6 / 8डिझएलच्या दरात 91 पैशांची घसरण होऊन तो 90.70 रुपयांवर आला आहे. पाटणा येथील दरही 106.44 रुपयांवरून घसरून शुक्रवारी सकाळी 105.90 रुपयांवर आल्याचे दिसून आले.7 / 8या ठिकाणी दर वाढले - गुडगांवमध्ये पेट्रोलचा दर काही प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. येथे पेट्रोल 95.59 रुपयांवर पोहोचले आहे. तर नोएडामध्ये हा दर वाढून 95.73 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. 8 / 8मेट्रो शहरांमध्ये काहीही बदल नाही - मेट्रो शहरांमध्ये तेलाच्या किंमतीत कसलाही बदल दिसून आला नाही. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये हा दर अनुक्रमे, 95.41, 104.67, 109.98, 91.43, आणि 101.40 रुपये प्रति लीटरवर जैसेथे आहेत.