By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:08 IST
1 / 7Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत आज MCX वर व्यवहार सुरू होताच घसरण दिसून येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम होताच सोन्या-चांदीमध्ये तेजी परतेल असं मानलं जात होतं. मात्र, युद्धविरामाबाबतच अनिश्चितता कायम असल्यानं कमोडिटी बाजार दबावाचा सामना करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर आज सोन्याचा भाव १,५३,८३० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४२,७४८ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.2 / 7गुरुवारी MCX वर सोन्याचा भाव १,५३,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४३,५९९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. कालच्या बंद भावापेक्षा आज सोन्यात ६७० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीमध्ये ८५१ रुपये प्रति किलोची घसरण पाहायला मिळत आहे. 3 / 7आपल्या १,८०,००० रुपयांच्या ऑल टाइम हाय रेकॉर्डपेक्षा सोने २६,१७० रुपयांनी खाली आलं आहे. तसेच चांदीचा भाव आपल्या ४,२०,००० रुपये प्रति किलोच्या ऑल टाइम हाय रेकॉर्डपेक्षा सध्या १,७७,२५२ रुपये प्रति किलोनं कमी झालाय.4 / 7दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५१,६२० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट गोल्ड रेट १,३८,९९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेटची किंमत १,१३,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. एक किलो चांदीची किंमत २,५४,९०० रुपये झाली आहे.5 / 7मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५३,००० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४०,२५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट गोल्ड रेट १,१४,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. चांदीचा भाव आज २,५४,९०० रुपये प्रति किलो झाला आहे.6 / 7चेन्नईत आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५२,७२० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट गोल्ड रेट १,३९,९९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१६,४९० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. एक किलो चांदीचा भाव २,५९,९०० रुपये झाला आहे.7 / 7कोलकात्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५३,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४०,२५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीची किंमत २,५४,९०० रुपये प्रति किलो झालीये.