शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:36 IST

1 / 8
सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी दिसत आहे. मंगळवारच्या बंद किमतीच्या तुलनेत, आज जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोने ३५५ रुपयांनी वधारून १०१२३९ रुपयांवर पोहोचले. तर, चांदीचा दर ८१८ रुपयांनी वधारला आहे.
2 / 8
आता जीएसटीशिवाय चांदी ११६५२५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तसेच, जीएसटीसह, सराफा बाजारात २४ कॅरेट सोने १०३८५१ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. याच वेळी, जीएसटीसह चांदी १२०१८८ रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे.
3 / 8
आयबीजेएनुसार, मंगळवारी जीएसटी शिवाय चांदी 115870 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. तर, सोने 100884 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. महत्वाचे म्हणजे, बुधवारी गणेश चतुर्थीमुळे या दोन्ही धातूच्या किंमती जारी झाल्या नव्हत्या.
4 / 8
आता 24 कॅरेट सोने 8 ऑगस्टच्या 101406 रुपये या ऑल टाइम हायच्या तुलनेत केवळ 167 रुपयांनीच स्वस्त राहिले आहे.
5 / 8
कॅरेटनुसार सोन्यची किंमत - आज २३ कॅरेट सोनेही ३५४ रुपयांनी वधारून १००४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. जजीएसटीसह याची किंमत १०३८५९ रुपये एवढी होते. यात अद्याप मेकिंग चार्ज समाविष्ट करण्यात आलेला नाही.
6 / 8
२२ कॅरेट सोन्याची किंमत ३२५ रुपयांनी वाढून ९२२१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली आहे. जीएसटीसह ती ९५५१७ रुपये आहे.
7 / 8
आज १८ कॅरेट सोन्याचा दर २६६ रुपयांनी वाढून ७५६६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​खुला झाला आणि जीएसटीसह ७८२०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला. तर, १४ कॅरेट सोने आता जीएसटीसह ६१००१ रुपयांवर पोहोचले आहे.
8 / 8
कॅरेटनुसार सोन्याचा दर कसा निश्चित होतो? - सोन्याचा दर त्याच्या शुद्धतेवर (Purity) अवलंबून असतो. जो कॅरेटमध्ये (Karat) मोजला जातो. सोन्याच्या दागीण्यात किती शुद्ध सोने आहे आणि इतर धातू किती प्रमाणात आहे? हे कॅरेट दर्शवते.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार