1 / 6एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे त्यामुळे सराफा बाजारात सोन्याचे दर उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर फेब्रुवारी महिन्यासाठी ०.३५ टक्क्यांनी वाढून ५६५०० रुपये प्रति १० ग्राम झाले आहेत. 2 / 6शुक्रवारी हा दर ५६,३७० रुपये होता. चांदीचाही वायदा दर मार्चसाठी ०.७५ टक्क्यांच्या तेजीसह ६९९६० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. नोव्हेंबर महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे. डॉलर्सची घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात धीम्या गतीनं होणारी वाढ यामुळे सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. 3 / 6जागतिक बाजारात, स्पॉट गोल्ड ०.३ टक्क्यांनी वाढून १,९२६.०७ डॉलर्स प्रति औंस या नऊ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. डॉलर निर्देशांक आज ०.३ टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे डॉलरपेक्षा सोन्याकडे कल अधिक वाढला.4 / 6सोमवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५६,४९४ रुपये होता, सकाळच्या सत्रात तो १७३ रुपयांनी वाढला. आज सोन्याचा व्यवहार ५६,४६७ रुपयांपासून सुरू झाला. 5 / 6सुरुवातीला कामकाजादरम्यान हे दर ५६,५०० रुपयांपर्यंत गेली. पण, नंतर त्यात थोडी घसरण झाली. दुसरीकडे, वायदा बाजारात आज चांदीचा दर ४९६ रुपयांनी वाढला असून तो ६९,९२३ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. चांदीचा दर ६९,५०० रुपयांवर खुला झाला.6 / 6२४ कॅरेट सोनं ९९.९ टक्के शुद्ध असतं आणि २२ कॅरेट सोनं ९१ टक्के शुद्ध असतं. यामध्ये ९ टक्के अन्य धातू जसं की तांबे, चांदी, झिंक मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोनं सर्वात शुद्ध असल्याने ते खुप लवचिक आणि कमकुवत असते. त्यामुळे यात सोनं तयार करता येत नाही.