1 / 7Gold Silver Price 2 May: लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरानं एक लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता त्यात घसरण होत आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमधील विक्रमी तेजी नंतर मे महिन्यात सोन्याच्या दराची सुरुवात घसरणीसह झाली आहे.2 / 7आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६८ रुपये प्रति १० ग्रॅम इतका स्वस्त झाला. यानंतर सोन्याचा भात ९३,३९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी ८६ रुपयांनी वधारून ९४,२०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. जीएसटीमुळे सोन्याचा भाव आता ९६,१९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदीचा भाव ९७,०२६ रुपये प्रति किलो झाला आहे.3 / 7इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.4 / 7आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंही आज ९६४ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९३,०१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. त्याच वेळी, दुपारी १२:१५ च्या सुमारास २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत ८८७ रुपयांनी घसरून ८५५४८ रुपयांवर उघडली. 5 / 7१८ कॅरेट सोन्याची किंमत देखील ७२६ रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम ७००४५ रुपयांवर आली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ५६६ रुपयांनी घसरून ५४६३५ रुपयांवर आली आहे.6 / 7रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, चीननं अमेरिकेच्या काही वस्तूंवरील शुल्क हटवण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे सोन्याच्या 'सुरक्षित गुंतवणूकी'च्या प्रतिमेला धक्का बसला आहे.7 / 7सोन्याचे दर आणखी घसरणार का? या प्रश्नावर केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांनी हिंदुस्थानला सांगितलं की, सोन्याच्या दरात सुधारणा होण्यास वेळ लागेल. पुढच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत सोनं घसरलं तर ते ७८००० ते ८०००० वर येईल आणि वरच्या स्तरावर ते १०२००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.