1 / 10मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच दोन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ झाली होती. (Gold Rate Today)2 / 10तीन सत्रात तेजीत असलेल्या सोने आणि चांदीमध्ये नफावसुली झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मंगळवारी सोन्याच्या किमतीत १३० रुपयांची तर चांदीमध्ये ३२० रुपयांची घसरण झाली आहे.3 / 10मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने १३० रुपयांनी स्वस्त झाले. बाजार खुला झाला, तेव्हा सोने ४७००८ रुपयांवर होते. त्यानंतर त्यात घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६८९११ रुपये असून त्यात ३२२ रुपयांची घसरण झाली आहे. 4 / 10एमसीएक्सवर सोमवारी बाजार बंद होताना ४६९९७ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात ७२ रुपयांची वाढ झाली होती. चांदीमध्ये २३४ रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा भाव ६९१८४ रुपयांवर स्थिरावला होता.5 / 10मात्र, त्यात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार १७० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४७ हजार १७० रुपये आहे. 6 / 10दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार १५० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५० हजार २५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४ हजार ३५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ४०० रुपये आहे. 7 / 10कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ६७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार २२० रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.२ टक्के घसरण झाली. 8 / 10सोन्याचा भाव १७७५.४२ डॉलर प्रती औंस आहे. याआधी सोन्याचा भाव १७७० डॉलरपर्यंत खाली घसरला होता. तर चांदीचा भाव २६.०७ डॉलर आहे. 9 / 10एप्रिल आणि मे या दोन महिन्यात देशात ६.९१ अब्ज डॉलर्स सोन्याची आयात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अर्थव्यवस्था सावरल्यास सोन्याचा भाव आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 10 / 10कोरोना नियंत्रण आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने सोने महागणार किंवा स्वस्त होणार यासंदर्भात कमॉडिटी विश्लेषकांमध्ये मत मतांतरे असल्याचे दिसून येत आहे.