शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

By जयदीप दाभोळकर | Updated: July 7, 2025 09:19 IST

1 / 7
जर तुम्ही मुलीचे आई वडील असाल आणि तुम्ही तिच्या चांगल्या भविष्याचे, उत्तम शिक्षणाचे आणि विवाहाच्या दृष्टीनं तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महागाईच्या या युगात तुम्हाला या अनेक गोष्टींची चिंता असेल, पण आता तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकता. खरं तर, भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) एक उत्तम स्कीम तुमचा सर्व ताणतणाव संपवू शकते.
2 / 7
मुलींचं भविष्य सुरक्षित करणाऱ्या या योजनेला लोक प्रेमानं 'कन्यादान पॉलिसी' म्हणतात. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी दररोजच्या चहा आणि नाश्त्याला लागणाऱ्या पैशांइतकेच पैसे वाचवून लाखोंचा निधी निर्माण करू शकता. या योजनेची संपूर्ण गणना समजून घेऊया.
3 / 7
खरंतर ही एलआयसीची एक अतिशय प्रसिद्ध पॉलिसी आहे, जी मुलीचं भविष्य लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. ही एक पिगी बँक आहे जी मुलीचे भविष्य सुरक्षित करते, ज्यामध्ये तुम्ही दररोज थोडे पैसे गुंतवता आणि मॅच्युरिटीवर मोठी रक्कम मिळवता. ही पॉलिसी बचत आणि विम्याचे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.
4 / 7
छोट्या बचतीतून मोठं साम्राज्य कसं उभारता येईल हे ही स्कीम दाखवते. यामध्ये तुम्हाला दररोजचे फक्त १२१ रुपये वाचवावे लागतील. यामध्ये महिन्याची तुम्ही ३६०० रुपये वाचवाल. या पॉलिसीची मुदत २५ वर्षांची आहे. यामध्ये तुम्ही फक्त २२ वर्षे हप्ते भराल, त्यानंतर पुढचे ३ वर्ष तुम्हाला हप्ते भरावे लागणार नाहीत. मॅच्युरिटीवर तुम्हाला तब्बल २७ लाख रुपये मिळतील.
5 / 7
अशा परिस्थितीत, कल्पना करा की दररोज फक्त १२१ रुपयांची बचत करून, तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या २५ व्या वाढदिवशी २७ लाख रुपये भेट देऊ शकता. या पैशातून तुमची मुलगी पुढील शिक्षण घेऊ शकते किंवा तिची स्वप्ने पूर्ण करू शकते.
6 / 7
सर्वात खास गोष्ट म्हणजे पॉलिसी कालावधीत वडिलांचा मृत्यू झाला तरी कुटुंबावर कोणताही भार पडणार नाही, एलआयसी भविष्यातील सर्व हप्ते स्वतः भरेल. हो, याद्वारे, कुटुंबाला १० लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत (अपघाती मृत्यू झाल्यास) मिळेल.
7 / 7
या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी, वडिलांचं वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. त्याच वेळी, तुमच्या मुलीचं वय किमान १ वर्ष असलं पाहिजे. तसे, ही योजना त्या सर्व पालकांसाठी वरदान आहे जे त्यांच्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू इच्छितात. महागाईच्या काळात तुमच्या मुलीच्या स्वप्नांना पंख देण्याचा हा एक उत्तम आणि सुरक्षित मार्ग असू शकतो.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा