1 / 8तुम्हीही एखाद्या बँकेत मुदत ठेवी (Fixed Deposit) अंतर्गत काही रक्कम जमा केली असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आता मुदत ठेवीची मुदत संपताच क्लेम करावी लागणार आहे. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. 2 / 8भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मुदत ठेवी संदर्भातील नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. नेमके काय आहेत हे बदल ते जाणून घेऊयात..3 / 8मुदत ठेवीबाबतच्या बदललेल्या नियमांनुसार तुम्ही बँकेत ठेवलेली रक्कम मुदत संपल्यानंतरही तशीच ठेवली म्हणजेच ती बँकेकडू पडून राहिली तर त्यावर मिळणारं व्याज हे मुदत ठेवीच्या योजनेनुसार तुम्हाला मिळणार नाही. 4 / 8 मुदत ठेव तुम्ही क्लेम केली नाही किंवा ती काढून घेतली नाही. तर त्यावर बँक बजत खात्याप्रमाणेच व्याज जमा करेल. त्यामुळे मुदत ठेवीच्या अधिकच्या व्याजदराचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. यात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं 5 / 8आरबीआयनं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार एखादी मुदत ठेव संपुष्टात आली आणि त्यावर कुणीही हक्क न सांगितल्यास किंवा ती रिन्यू (Renew) न केल्यास त्यावर बँकेकडून बजत खात्याच्या व्याज दरानुसारच व्याज दिलं जाईल.6 / 8रिझर्व्ह बँकेनं लागू केलेला हा नियम सर्व प्रकारच्या बँकांसाठी जाहीर करण्यात आला आहे. यात कमर्शियल बँक, स्मॉल फायनान्स बँक, अर्बन कोऑपरेटीव्ह बँक, लोकल एरिया बँक, स्टेट कोऑपरेटीव्ह बँक आणि जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटीव्ह बँक अशा सर्व बँकांसाठी लागू असणार आहे. 7 / 8एफडीमध्ये ग्राहकाला एकरकमी रक्कम बँकेत ठरावीत मुदतीसाठी जमा करावी लागते. यात सामान्य बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा थोडं अधिक व्याज ग्राहकांना बँकेकडून दिलं जातं. याशिवाय एफडी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांसाठी केली तर टॅक्स सेव्हिंगमध्येही त्याचा लाभ घेता येतो. 8 / 8 एफडी तुम्हाला कोणत्याही बँकेत करता येते. याशिवाय पोस्ट ऑफीसमध्येही एफडीची सुविधा आहे. एफडीवर गुंतवणूक कर्ज देखील मिळवता येतं. पण असं केलं तर टॅक्स सेव्हिंगचा लाभ घेता येत नाही.