शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:34 IST

1 / 6
प्रत्येक भारतीय नागरिकावर सरासरी ४.८ लाख रुपयांचे कर्ज आहे. मार्च २०२३ मध्ये ते ३.९ लाख रुपये इतके होते.
2 / 6
मागील २ वर्षांत भारतीयांवरील कर्जाच्या बोजात २३ टक्के वाढ झाली असून, दरडोई कर्ज सरासरी ९० हजार रुपयांनी वाढले आहे.
3 / 6
आरबीआयनुसार भारतीयांवर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डाची थकबाकी, वाहन कर्ज यांसह इतर किरकोळ स्वरूपातील कर्ज आहे.
4 / 6
मागील २ वर्षांत बिगर-गृह किरकोळ कर्जासारख्या वैयक्तिक कर्जात ५४.९ टक्के वाढ झाली आहे. हे प्रमाण खर्च करण्याजोग्या उत्पन्नाच्या २५.७% आहे. गृहकर्जाची हिस्सेदारी २९ % आहे.
5 / 6
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतीयांवरील कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या तुलनेत ४२ टक्के आहे. अन्य उगवत्या अर्थव्यवस्थांत हे प्रमाण ४६.६ टक्के आहे.
6 / 6
याचाच अर्थ भारतातील कर्जाची स्थिती अन्य उगवत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत नियंत्रणात आहे. तसेच भारतीयांच्या कर्जाचे मानांकनही चांगले आहे. म्हणजेच कर्ज बुडण्याचा धोका कमी आहे.
टॅग्स :bankबँकInvestmentगुंतवणूक