शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनानं 'जॉब मार्केट'चे वाजले तीन तेरा, किती लोकांचे अर्ज झाले 'रिजेक्ट' एकदा पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:19 IST

1 / 8
कोरोनामुळे अनेक व्यवसाय तर बुडालेच पण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि फ्रेशर्ससाठी देखील संधी आता उपलब्ध होताना दिसत नाहीत. देशातील तरुणाईला नोकरीची संधी मिळणं खूप कठीण होऊन बसलं आहे.
2 / 8
कोरोनामुळे जॉब मार्केटचे पूर्णपणे तीन तेरा वाजले आहेत. LinkedIn च्या एका सर्वेक्षणानुसार जॉब मार्केटमध्ये जिथं अनुभवी नोकरदार वर्गासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर फ्रेशर्ससाठी देखील नोकरी मिळवणं खूप अवघड होऊन बसलं आहे.
3 / 8
LinkedIn नं हे सर्वेक्षण Gen-Z दरम्यान केलं आहे. ज्यांचा जन्म १९९५ ते २०१० या कालावधीत झाला आहे अशा वयोगटाला Gen-Z मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यानुसार या वयोगटात १८ ते २४ वर्षाची तरुणाई येते.
4 / 8
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं रोजगार क्षेत्राला खूप मोठा फटका बसाल आहे. LinkedInच्या सर्व्हेक्षणानुसार Gen-Z च्या ७० टक्के म्हणजे दर १० जणांमागे ७ जणांचा नोकरीचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. वेटिंग पीरिएडवर थांबण्याची तयारी असूनही नोकरी मिळणं कठीण झालं आहे.
5 / 8
नोकरीचा अर्ज फेटाळून लावण्यात आलेल्यांपैकी ९० टक्के लोक मानसिकरित्या खचून गेल्याचंही LinkedInच्या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.
6 / 8
आर्थिक तणावासोबतच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तरुणाई सध्या मानसिक तणावाच्या समस्येलाही सामोरी जात आहे.
7 / 8
LinkedInच्या सर्व्हेक्षणाचा व्यवस्थित अभ्यास केल्यास लक्षात येतं की देशातील तरुणाईचं भविष्य अतिशय खडतर असल्याचं स्पष्ट दिसून येतं.
8 / 8
कोरोनामुळे तरुणाईच्या करिअर आणि शिक्षणाच्या आगामी योजनांची तयारी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. LinkedInनं आपला संपूर्ण अहवाल Career Aspirations Gen Z India नावावं प्रकाशित केला आहे.
टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनcorona virusकोरोना वायरस बातम्या