डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:19 IST
1 / 6आजच्या काळात इंटरनेट ही लोकांची गरज बनली आहे. लोक इंटरनेटशिवाय थोडा वेळही घालवू शकत नाहीत. भारतातील तरुण रोज सरासरी ३ तास मोबाईल पाहण्यात घालवतात. यावरुन तुम्हाला अंदाच आलाच असेल. आता तर ५ जी इंटरनेट स्पीड आल्याने डेटाही वेगाने संपून जातो.2 / 6अशा परिस्थितीत, जर डेटा संपला किंवा अन्य कोणत्याही कारणाने नेट चालत नसेल तर लोक पब्लिक वाय-फायशी फोन कनेक्ट करतात. तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.3 / 6वास्तविक, सार्वजनिक वाय-फाय सुरक्षित नाहीत. तुम्ही अशा इंटरनेटशी तुमचा फोन जोडला तर सायबर गुन्हेगार आणि स्कॅमर्ससाठी सोपं सावज ठरतं. सायबर गुन्हेगार तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आणि तुमची फसवणूक करण्यासाठी सार्वजनिक वाय-फाय वापरतात.4 / 6इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) म्हणते की बँकिंग सेवा किंवा ऑनलाइन शॉपिंगसारख्या गोष्टींसाठी सार्वजनिक वाय-फाय कधीही वापरू नये.5 / 6याशिवाय, सार्वजनिक वाय-फाय वापरून कधीही ऑनलाइन पेमेंट किंवा आर्थिक संबंधित कोणतेही काम करू नका.6 / 6कोणीही सार्वजनिक वाय-फाय वापरू शकतो. अशा परिस्थितीत, स्कॅमर सहजपणे सार्वजनिक वाय-फाय हॅक करतात आणि लोकांची वैयक्तिक माहिती देखील सहजपणे चोरतात, ज्याद्वारे ते सायबर फसवणूक आणि गुन्हे करतात.