बाजारात डिजीटल रुपया लाँच! मोबिक्विक आणि क्रेडकडून सादर; चलन कागदी नोटांपेक्षा किती वेगळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:14 IST
1 / 5देशात इंटरनेटचा वेग वाढला तशा अनेक गोष्टी बदलल्यात. आता भाजीच्या जुडीपासून कोट्यावधी रुपयांचे आर्थिक व्यवहार मोबाईलवरुन होत आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे की कित्येक दिवसांपासून नोटा पाहिल्या नसतील असे लोक आहेत. यात आता आणखी एक पुढचं पाऊल टाकण्यात आलं आहे. 2 / 5डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विक आणि पेमेंट प्लॅटफॉर्म क्रेडने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि येस बँकेच्या भागीदारीत डिजिटल रुपया सादर केला आहे. या डिजिटल रुपयाचे काय वैशिष्ट्य आहे? हा सामान्य चलनापेक्षा वेगळा कसा? ते जाणून घेऊ.3 / 5ई-रुपी वॉलेटसह येणारे मोबिक्विक हे पहिले डिजिटल वॉलेट आहे. नवीन सीबीडीसी उत्पादन त्याच्या सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ई-रुपी वॉलेट वापरकर्त्यांना UPI द्वारे इतर ई-रुपी वॉलेट तसेच नियमित बँक खात्यांमध्ये पैसे पाठवू आणि प्राप्त करता येते.4 / 5डिजिटल रुपया हे भारतीय रुपयाचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. कागदी चलन, त्याला ई-रुपया असेही म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे ई-रुपी तयार आणि नियंत्रित केले जाते. डिजीटल रुपयाचा वापर व्यवहार करण्यासाठी, डिजीटल पद्धतीने पैसे साठवण्यासाठी आणि इतर प्रकारची पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो.5 / 5डिजीटल रुपया २ प्रकारात उपलब्ध आहे. यापैकी, पहिला CBDC-R म्हणजेच किरकोळ आणि दुसरा CBDC-W घाऊक आहे. ई-रुपी किरकोळ गैर-आर्थिक ग्राहक, खाजगी क्षेत्र आणि चालू व्यवसायांसाठी आहे. त्याचा वापर दैनंदिन व्यवहारांसाठी केला जाईल, तर घाऊक ई-रुपी काही निवडक वित्तीय संस्थांसाठी असेल.