By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:08 IST
1 / 5 Credit Card UPI Link: मागील काही वर्षापासून भारतात UPI चा वापर झपाट्याने वाढत आहे. या UPI मुळे ऑनलाइन पेमेंट अतिशय सोपे झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले, तर ते तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. त्याचा योग्य वापर करुन तुम्ही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकसारखे फायदे मिळवू शकता.2 / 5 क्रेडिट कार्डद्वारे फायदे मिळवण्यासाठी UPI शी कार्ड कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेचा वापर करून UPI पेमेंट करू शकता. यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही.3 / 5 रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकचा फायदा- क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात डेबिट कार्डपेक्षा जास्त रिवॉर्ड मिळतात. तुम्ही तुमचे RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले असेल, तर तुम्हाला प्रत्येक UPI व्यवहारावर रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक देखील मिळू शकतो.4 / 5 कुठेही करा पेमेंट- क्रेडिट कार्डने पैसे करणे सोपे नसते. विशेषतः लहान दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. तुम्हाला सर्वत्र POS मशीन मिळत नाही. पण, जर तुम्ही UPI ला क्रेडिट कार्डशी लिंक केले, तर तुम्ही सर्वत्र QR कोडद्वारे पेमेंट करू शकता.5 / 5 तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले, तर ते तुमच्यासाठी बॅकअप पेमेंट पर्याय म्हणून देखील काम करते. जेव्हा तुम्हाला मोठी खरेदी करण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत याचा फायदा होतो.