शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेफ, सिक्युरिटी... मुकेश अंबानींच्या घरात कर्मचाऱ्यांची फौज, सॅलरी किती; कोणत्या मिळतात सुविधा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:48 IST

1 / 7
Mukesh Ambani News: मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते पत्नी नीता अंबानी आणि कुटुंबासोबत 'अँटिलिया'मध्ये राहतात. हे जगातील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे.
2 / 7
या भव्य घरातील कामकाज पाहण्यासाठी किती लोकांची गरज आहे, हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'अँटिलिया'मध्ये ५०० हून अधिक कर्मचारी काम करतात. घरातील दैनंदिन कामं सुरळीत पणे चालण्यासाठी हे कर्मचारी मदत करतात.
3 / 7
अँटिलियामध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना चांगला पगार मिळतो. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, अनेक चाकरमान्यांचे मासिक वेतन दीड ते दोन लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हा पगार अतिशय आकर्षक असून त्यातून त्यांचं दैनंदिन जीवन अतिशय उत्तम चालतं.
4 / 7
वेतनाव्यतिरिक्त 'अँटिलिया'च्या कर्मचाऱ्यांना इतरही अनेक सुविधा मिळतात. त्यांना कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय विमा आणि इतर लाभ दिले जातात. त्यांचं वेतन आणि सुविधा त्यांच्या कामानुसार आणि जबाबदाऱ्यांनुसार ठरवल्या जातात. हाउसकीपिंग, सिक्युरिटी, शेफ, पर्सनल अटेंडंट, प्रत्येक कर्मचारी घर सुरळीत चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
5 / 7
अंबानी कुटुंबीय भारतीय परंपरा आणि चालीरीतींना खूप महत्त्व देतात. त्याची खासियत मंगळवारीही दिसून आली. मुकेश अंबानी आपल्या कुटुंबातील चार पिढ्यांसह महाकुंभात पोहोचले आणि कुटुंबासह संगमात स्नान केलं. मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी, आकाशची पत्नी श्लोका अंबानी आणि त्यांची मुले पृथ्वी आणि वेदा, अनंत अंबानी यांची पत्नी राधिका मर्चंट देखील उपस्थित होते.
6 / 7
मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी, बहीण नीनाबेन आणि दीप्तीबेन, नीता अंबानी यांची आई पौर्णिमा दलाल आणि बहीण ममता दलाल यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते.
7 / 7
रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे परमार्थ निकेतन आश्रम, शारदा पीठ मठ ट्रस्ट द्वारका, श्री शंकराचार्य उत्सव सेवालय फाउंडेशन, निरंजनी आखाडा आणि प्रभू प्रेमी संघ चॅरिटेबल ट्रस्ट या नामांकित आध्यात्मिक संस्थांच्या सहकार्यानं अन्नवाटप करण्यात येत आहे. अंबानी कुटुंबीयांनी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेटही दान केलेत.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानी